“ऐश्वर्याचं सलमानवर आजही तितकंच प्रेम”; ‘तो’ व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल

On: May 7, 2024 2:33 PM
Aishwarya Rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दल अजूनही चर्चा होत असते. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले सलमान आणि ऐश्वर्या काही कारणांमुळे वेगळे झाले. त्यांची जोडी तेव्हा प्रचंड फेमस होती. लवकरच ते दोघे लग्न करतील, अशा चर्चा तेव्हा व्हायच्या. मात्र, त्यांच्या दोघांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.

भांडण झाल्यानंतर ऐश्वर्या सलमान पासून वेगळी झाली. पुढे काही काळ तिचं नाव अभिनेता विवेक ओबेरॉयसोबतही जोडलं गेलं. यामुळे विवेक आणि सलमानचे झालेले वाद तर प्रचलित आहेत. मात्र, ऐश्वर्याने आयुष्यभराच्या साथीसाठी तिसऱ्याचीच निवड केली.तिने अभिषेक बच्चन सोबत लग्न करत संसार थाटला. तर, सलमान अजूनही सिंगल आयुष्य जगत आहे.

काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत खूपच बोललं जातंय. दोघेही लवकरच घटस्फोट घेणार, इथपर्यंत या चर्चा केल्या गेल्या.मात्र, ऐश्वर्या नेहमी बच्चन कुटुंबासोबत दिसून आल्याने नेमकं त्यांच्यात चाललंय तरी काय, याबाबत कायमच संभ्रम राहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@salman.khan.heart)

ऐश्वर्या-सलमानचा व्हिडिओ व्हायरल

अशात सलमान आणि ऐश्वर्याबद्दलही चर्चा होत आहेत. त्यांचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या सलमानला बघून जाम खुश झाल्याचं दिसतंय. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान रॉयल अंदाजात रॅम्प वॉक करताना दिसून येतोय. त्याठिकाणी ऐश्वर्या देखील उपस्थित आहे. सलमान याला पाहताच ऐश्वर्या आनंदी होते आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवताना दिसत आहे. त्यानंतर शेजारी बसलेल्या व्यक्तींसोबत बोलताना अभिनेत्री दिसत आहे. पण सलमानवरून अभिनेत्रीची (Aishwarya Rai) नजर हटत नाही. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऐश्वर्या सलमानला पाहतच राहिली

ऐश्वर्या – सलमान यांचा जुना व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘दोघांमध्ये खरं प्रेम होतं. म्हणून लग्न होऊ शकलं नाही, प्रेम दुसऱ्यांदा होत नाही…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खान कायम हँडसम दिसतो..’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्या हिच्या डोळ्यांमध्ये प्रेम दिसत आहे…’, अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सलमान आणि ऐश्वर्या (Aishwarya Rai) चर्चेत आले आहेत.

News Title – Aishwarya Rai Salman Khan Video Viral

महत्त्वाच्या बातम्या-

“…तर अजित दादा तुम्ही आज मुख्यमंत्री असता”

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या गाडीवर हल्ला, नेमकं काय घडलं?

लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मतदान केंद्रांवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली ‘ही’ मोठी भीती, म्हणाल्या…

मोठी बातमी! सुप्रिया सुळे अचानक पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, राजकारणात खळबळ

Join WhatsApp Group

Join Now