केस ओढले, मारहाण केली, शिवाय आक्षेपार्ह…’त्या’ दिवशी काय घडलं?, ऐश्वर्याचा मोठा खुलासा

On: February 14, 2025 3:23 PM
aishwarya
---Advertisement---

Aishwarya Rai | राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबातील वाद संपण्याचे नाव घेत नाही. त्यांची सून ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिने पती तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav), सासू राबडी देवी (Rabri Devi) आणि नणंद मीसा भारती (Misa Bharti) यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. ऐश्वर्याने आरोप केला आहे की राबडी देवी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी तिच्यावर हल्ला करून घराबाहेर काढले.

काय आहेत ऐश्वर्याचे आरोप?

राबडी देवी आणि त्यांच्या महिला सुरक्षा रक्षकांनी तिचे केस ओढले आणि मारहाण केली. तिचा मोबाईल हिसकावून घेतला, ज्यामध्ये तिच्यावर झालेल्या अत्याचारांचे पुरावे होते. तिच्या आई-वडिलांविरोधात आक्षेपार्ह पोस्टर्स पाटण्यातील कॉलेजमध्ये लावण्यात आले. सप्टेंबरमध्ये तिला भर पावसात घराबाहेर काढण्यात आले होते, नंतर न्यायालयाच्या आदेशानंतर तिला घरात परत येऊ देण्यात आले.

पोलीस अधिकारी आरती कुमारी जयस्वाल (Aarti Kumari Jaiswal) यांनी सांगितले की, ऐश्वर्याने (Aishwarya Rai) पोलिसांत तक्रार दाखल केली असून, एफआयआरनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

तेजस्वी यादव आणि चंद्रिका राय यांची प्रतिक्रिया

बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि लालू यादव यांचे दुसरे पुत्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती आहे, मात्र ते यावर काहीही भाष्य करत नाहीत, असे ऐश्वर्याने सांगितले.

तिचे वडील चंद्रिका राय (Chandrika Rai) यांनी तेजप्रताप यादव यांना ‘वेडसर’ म्हणत टीका केली आणि राबडी देवी यांचे कारनामे उघड करण्याचा इशारा दिला.

राबडी देवी व कुटुंबीयांचे उत्तर

राबडी देवी आणि तेजप्रताप यादव यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, तेजस्वी यादव यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, हे प्रकरण मुद्दाम उकरून काढले जात आहे, जेणेकरून राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष हटवले जाईल.

सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, लवकरच यावर निर्णय दिला जाईल, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. या वादामुळे लालू यादव कुटुंबातील अंतर्गत तणाव पुन्हा समोर आला आहे.

News Title : Aishwarya Rai Files FIR Against Rabri Devi

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now