‘स्क्रीनवर आपले कपडे काढून…’; Aishwarya Rai चा सर्वात मोठा खुलासा

On: August 11, 2024 2:34 PM
Aishwarya Rai
---Advertisement---

Aishwarya Rai | ऐश्वर्या राय बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारं एक नाव आहे. ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ने तिच्या चित्रपटांमधील किंसीग सीनबाबत एक मोठा खुलासा केला आहे. आणि ती तिच्या चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन देण्यास का नकार देते हे देखील सांगितलं आहे.

किंसीग सीन देणं माझ्यासाठी थोडं वादग्रस्त ठरतं, असं ऐश्वर्या राय म्हणाली. धूम 2 या चित्रपटा दरम्यान मी हृतिक रोशनसोबत किंसीग सीन शूट केला होता, तेव्हा मला ट्रोल करण्यात आलं होतं. मला अनेक प्रश्न विचारण्यात आले. ऐश्वर्याने सांगितलं की, इंटिमेट सीन्समुळे तिच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला.

ऐश्वर्या रायचा सर्वात मोठा खुलासा

यावेळी ऐश्वर्या म्हणाली, “किसिंग सीन किंवा इंटिमेट सीनबाबत वाद होऊ शकतो हे मला माहीत होतं. हा केवळ चित्रपटाचा एक भाग आहे, पण माझ्यासाठी हा एक मोठा मुद्दा होऊ शकतो.

ऐश्वर्या राय हिला ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये रणबीर कपूर याच्यासोबतच्या इंटीमेट सीन्सबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना ऐश्वर्या राय म्हणाली की, मी असं काही करणार नव्हते. लोकांना वाटतं की, अभिनेत्री ओपन माइंड असतात पण मी इतकी पण नाही की, स्क्रीनवर आपलं कपडे काढेल.

एक अभिनेत्री म्हणून आपली भूमिका चोख बजावणं ही जबाबदारी आहे. कधीकधी हे कठीण होतं, परंतु आपल्याला आपल्या कला आणि कार्याप्रती एकनिष्ठता राखली पाहिजे, असंही ऐश्वर्या यावेळी म्हणाली. तशी ऐश्वर्या रायची ही मुलाखत जुनी आहे. मात्र सध्या चांगलीच चर्चेत आल्याचं बघायला मिळतंय. ऐश्वर्या रायने अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत.

Aishwarya Rai आणि अभिषेकचा घटस्फोट होणार?

दरम्यान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे संबंध आता टोकाला गेल्याचे म्हटलं जातंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. दोघेही घटस्फोट घेणार असल्याचं देखील म्हटलं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?, अजित पवारांचं मोठं वक्तव्य

“माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा सर्वात मोठा खुलासा!

राहासोबत रणबीर कपूरच्या सासूने केलं असं काही… सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल!

मराठा आंदोलनाला मोठा धक्का! अचानक प्रकृती खालावली, जरांगे पाटलांचा धक्कादायक फोटो

दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी; विनाशुल्क भरता येणार अर्ज

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now