Aishwarya ने सलमान खानबाबत केला सर्वात मोठा खुलासा!

On: January 16, 2024 6:08 PM
salman khan
---Advertisement---

Aishwarya | बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतो. सोशल मीडियावर सलमान खानची फॅन फॉलोइंग पण काही कमी नाहीये. आपल्या चाहत्यांसाठी सलमान खान त्याच्या सोशल मीडियावर रोज नवनवीन फोटो पोस्ट करत असतो. दरम्यान, सलमान खान सध्या बिग बाॅस 17 मुळे चर्चेत आला आहे. त्याच्याबदल ऐश्वर्या शर्मा हिेने एक खुलासा केला आहे.

काय आहे नेमका प्रकार?

काही दिवसांपासून बिग बाॅस 17 चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, या वेळी अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने एका मुलाखतीमध्ये सलमान खानच्या काही चुकीच्या गोष्टींबदल काही खुलासे केले आहेत. ज्यामुळे सगळेकडी चर्चांना उधाण आलं.

अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा हिने अभिनेता आणि ‘बिग बॉस 17’ शोचा होस्ट सलमान खान याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र ऐश्वर्या आणि सलमान यांची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाली ऐश्वर्या?

‘बिग बॉस 17’ मधून बाहेर आल्यानंतर एका मुलाखती दरम्यान बोलत असताना ऐश्वर्या शर्मा (Aishwarya) म्हणाली, ‘सलमान खान याच्याबद्दल एक तक्रार आहे. नील आणि मी एकमेकांवर प्रचंड प्रेम करतो. आमची ही बाजू कधी शोमध्ये दाखवलीच नाही. 100 चांगल्या सवयींमध्ये फक्त एका वाईट गोष्टींवर भर दिला जातो आणि लोकं असं देखील करतात.

पुढे ऐश्वर्या म्हणाली की, शोमध्ये आम्ही दोघे देखील जसे आहोत, तसं वागत होतो. सलमान सरांनी त्या एका गोष्टीवर कधीच लक्ष दिलं नाही. सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ शोमध्ये ऐश्वर्या आणि नील भट्ट कायम भांडत असतात. सोशल मीडियावर देखील या दोघांना ट्रोल केलं जात होतं.

ऐश्वर्या आणि नीलमधील नातं-

ऐश्वर्या आणि नील दोघेजण पतील पत्नी असले तरी मात्र, या दोघांची केमिस्ट्री बिग बॉसच्या घरात दिसली नाही. सोशल मीडियावर दोघांना ट्रोल देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर, सलमान खान आणि निर्मात्यांनी नील आणि ऐश्वर्या यांच्या गेमला दुजोरा देण्याचा प्रयत्न केला. पण दोघांना देखील गेम समजलाच नाही, असं देखील सांगण्यात येत आहे.

News Title | Aishwarya gets angry on salman khan

महत्त्वाच्या बातम्या-

‘अत्यंत फालतू माणूस’; असीम सरोदेंची भगतसिंह कोश्यारींवर टीका

Adult Movies | ‘हे’ चित्रपट फॅमिलीसोबत चुकून पण पाहू नका!

Adah Sharma | अदा शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

Acharya Chanakya | यशस्वी व्हायचं असेल तर ‘अशा’ लोकांपासून लांबच राहा!

Life Insurance l लाईफ इन्शुरन्स घेण्याचा विचार करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा…

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now