एअरटेल ग्राहकांना मोठा फटका! फोन, इंटरनेट सेवा ठप्प

On: December 26, 2024 5:06 PM
Airtel
---Advertisement---

Airtel Service Down l आज एअरटेलच्या लाखो ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. कारण आज सकाळी 11 वाजल्यापासून देशभरातील एअरटेलची सेवा अचानकपणे ठप्प झाली आहे. यामुळे मोबाईल वापरकर्त्यांपासून ते ब्रॉडबँड ग्राहकांपर्यंत सर्वांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण झाले आहेत.

एअरटेल सेवा कोलमडल्याने लाखो ग्राहकांना मोठा फटका :

एअरटेल ही भारतातील एक प्रमुख टेलिकॉम कंपनी असून, देशभरात लाखो-करोडो ग्राहक त्याच्या सेवेचा वापर करतात. गुरुवारी सकाळच्या सुमारास 1,900 पेक्षा जास्त ग्राहकांनी सेवा ठप्प झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. मात्र ही समस्या अचानकपणे उद्भवल्याने ग्राहकांचे दैनंदिन कामे पूर्णपणे खंडित झाली आहेत.

एअरटेलच्या या समस्येमुळे मोबाईल सिग्नल्स देखील मिळत नाही. याशिवाय इंटरनेट सेवा देखील ठप्प झाली आहे. मात्र आता ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे सिग्नल्स मिळत नाहीत, आणि इंटरनेट सेवा सुद्धा पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे ऑनलाइन कामे, व्हिडिओ कॉल्स, आणि इतर डिजिटल सेवांचा वापर करणे अशक्य झाले आहे.

Airtel Service Down l मोबाईलपासून ते ब्रॉडबँडपर्यंत सर्वच ठिकाणी अडथळे :

एअरटेलची सेवा ठप्प होण्यामुळे फक्त मोबाईल ग्राहकांच नाही तर ब्रॉडबँड ग्राहकांसुद्धा त्रास होत आहे. घरगुती आणि व्यावसायिक ब्रॉडबँड सेवा सुद्धा पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक कंपन्या आणि व्यवसायांचे कामे खंडित झाले आहेत. ऑनलाइन शिक्षण, रिमोट वर्क, आणि इतर डिजिटल सेवांवर ही समस्या परिणाम करीत आहे.

मात्र आता कंपनीने ही समस्या सोडवली आहे. तरी देखील अनेक ग्राहकांच्या मोबाईलमधील इंटरनेट सेवा अजूनही कासवगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी कॉल ड्रॉपचा फटका बसला आहे.

News Title : Airtel Service is Down

महत्वाच्या बातम्या –

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी केली फाशीची मागणी!

सरपंच संतोष देशमुख प्रकरणी पंकजा मुंडेंचा सर्वात मोठा खुलासा!

तब्बल ‘इतक्या’ वर्षांपासून अक्षय आणि मोहिनी वाघचे संबंध! संपूर्ण प्रेमप्रकरण आलं समोर

अखेर सतीश वाघ हत्येमागचा मास्टरमाइंड समोर! …अत्यंत जवळच्या व्यक्तीनेचं काढला काटा

संतोष देशमुख प्रकरणी सुरेश धसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now