अहमदाबाद विमान अपघातातील, ब्लॅक बॉक्सबद्दल धक्कादायक माहिती समोर!

On: June 19, 2025 7:13 PM
Ahamdabad Plane Crash
---Advertisement---

Ahamdabad Plane Crash | एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन प्रवास करणाऱ्या बोइंग ७८७ या विमानाचा १२ जून रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’मधील माहितीचे विश्लेषण करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, भीषण स्फोटात या ब्लॅक बॉक्सला बरीच हानी पोहोचली आहे. अशा परिस्थितीत, भारतात त्याच्यातील माहिती काढणे कठीण होऊन बसले आहे, त्यामुळे आता हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेत पाठवला जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’ आणि ‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’ यांची एकत्रित माहिती असलेल्या उपकरणाला ‘ब्लॅक बॉक्स’ म्हटले जाते. विमानाच्या मागच्या बाजूला, जिथे अपघात झाल्यानंतर तुलनेने कमी धक्का बसण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी ब्लॅक बॉक्स ठेवला जातो. नावात जरी ‘ब्लॅक’ (काळा) असा शब्द असला तरी, प्रत्यक्षात हे उपकरण नारिंगी रंगाचे असते, ज्यामुळे ते ढिगाऱ्यातून सहज (Ahamdabad Plane Crash) शोधता येते.

समोर आलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या (Ahamdabad Plane Crash) अपघातानंतर १००० अंश सेल्सिअसपेक्षाही अधिकचे तापमान निर्माण झाले होते. या प्रचंड उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्सचे बरेच नुकसान झाले. प्रचंड नुकसान झालेल्या ब्लॅक बॉक्समधून माहिती संपादित करण्याचे तंत्रज्ञान सध्या भारतात उपलब्ध नाही. त्यामुळेच, वॉशिंग्टनस्थित असलेल्या ‘नॅशनल सेफ्टी ट्रान्सपोर्ट बोर्ड’ (National Safety Transport Board – NTSB) या प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्स पाठवला जाणार आहे, जिथे त्याचे सखोल विश्लेषण केले जाईल.

प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण-

वॉशिंग्टनच्या प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण केल्यानंतर, त्यातून मिळालेली माहिती भारतीय विमान अपघात तपास संस्थेकडे (Aircraft Accident Investigation Bureau – AAIB) सोपवली जाईल. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, ज्या देशात विमान अपघात घडतो, त्याच देशाकडे अपघाताच्या तपासाचे नेतृत्व असते. या नियमानुसार, प्रयोगशाळेचा अहवाल भारतीय संस्थेकडे सुपूर्द केला जाईल, जी अंतिम अहवाल तयार करेल.

एएआयबीने दिल्ली येथे गेल्याच वर्षी प्रयोगशाळा स्थापन केली होती, परंतु ब्लॅक बॉक्सचे खूपच नुकसान झाल्यामुळे त्यातून माहिती मिळवण्यासाठी ही प्रयोगशाळा अद्याप सुसज्ज नाही. भारतातील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली NTSB सदर ब्लॅक बॉक्स अमेरिकेतील त्यांच्या प्रयोगशाळेत घेऊन जाईल, अशी माहिती या प्रक्रियेत सामील असलेल्या एका अधिकाऱ्याने फायनान्शियल डेलीला दिली.

News Title – Air India’s Damaged Black Box to Sent to US

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now