Air India viral video | एअर इंडियाच्या AI 171 फ्लाइटच्या भीषण अपघातानंतर केवळ आठवडाभरात सोशल मीडियावर एक डान्स पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात AISATS (Air India SATS) या ग्राउंड हँडलिंग कंपनीचे चार कर्मचारी पार्टी करताना दिसतात. या व्हिडिओमुळे प्रचंड जनतेचा संताप उसळला असून, संवेदनशीलतेच्या अभावाबद्दल एअर इंडिया सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
या व्हिडिओमध्ये सहभागी असलेल्या चार कर्मचाऱ्यांना तत्काळ राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एअर इंडियाने शुक्रवारी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, “AI 171 अपघातातील मृतांच्या कुटुंबांप्रती आम्हाला सहवेदना असून, अशा वागणुकीसाठी आमच्या संस्थेत कोणतेही स्थान नाही.”
पार्टी गुरुग्राम कार्यालयात; व्हिडिओने चिथावले भावना :
मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ 20 जूनचा असून AISATS च्या गुरुग्राम कार्यालयात शूट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही घटना 12 जूनच्या अपघाताच्या फक्त आठ दिवसांनंतरची आहे. त्यामुळे लोकांच्या भावना अधिक चिथावल्या गेल्या आहेत.
4 executives of Air India venture AISATS seen ‘partying’ days after Ahmedabad crash fired
Read More: https://t.co/Lrz8YzV97X#aisats #airindiacrash #ahmedabadcrashaftermath #aviationnews #publicoutrage #readselective pic.twitter.com/PZPuXO1ku0
— readselective feed (@ReadSelective_) June 28, 2025
AI 171 फ्लाइट अहमदाबादहून लंडनला जात असताना टेकऑफनंतर एका हॉस्टेल इमारतीवर आदळले. या अपघातात एकूण 270 जणांपैकी 269 जणांचा मृत्यू झाला. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता.
Air India viral video | डीजीसीएकडूनही तडकाफडकी निर्णय :
या दुर्घटनेतील अनेक प्रशासनिक चुका उघड झाल्यानंतर, DGCA ने 21 जूनला एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ हटवण्याचे आदेश दिले होते. यात विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि नियोजन अधिकारी पायल अरोरा यांचा समावेश होता.
दरम्यान, AI 171 अपघातानंतरही असंवेदनशीलतेने पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात घेतलेली ही कारवाई ही जनतेच्या संतापानंतर उचललेली तातडीची पावले असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र, अशा मोठ्या आपत्तीनंतरही संघटनात्मक स्तरावर पुरेशी सजगता न दाखवणं हे एअर इंडियासारख्या राष्ट्रीय वाहकासाठी मोठा धक्का मानला जातो आहे.






