एअर इंडिया विमान अपघाताचं धक्कादायक कारण आलं समोर!

On: July 12, 2025 12:36 PM
Air India Crash
---Advertisement---

Air India Crash | 12 जून 2026 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालात (AAIB Report) मोठा खुलासा झाला आहे. टेकऑफनंतर काही सेकंदातच विमानाची दोन्ही इंजिनं अचानक बंद झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे विमानाला स्थिरता राखता आली नाही आणि ते जमिनीवर कोसळलं.

पायलटांमध्ये संभ्रम; कॉकपिट संवादातून संशयाला उधाण :

Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) ने प्रसिद्ध केलेल्या 15 पानी अहवालात, टेकऑफवेळी विमान 180 नॉट्स स्पीडवर पोहोचल्याचं आणि त्यानंतर काही सेकंदांतच इंजिन 1 व 2 मधील इंधनपुरवठा कट ऑफ झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

या दुर्घटनेचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर तपासण्यात आला असता, एक पायलट दुसऱ्याला “तू इंजिन का बंद केलं?” असं विचारताना ऐकू आलं. दुसऱ्या पायलटने “मी काहीच केलं नाही” असं उत्तर दिलं. या संवादावरून, इंजिनं पायलटने मुद्दाम बंद केली नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यामागे तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Air India Crash)

Air India Crash | इंजिन रिस्टार्टचा प्रयत्न, Ram Air Turbine सक्रिय :

अपघातानंतर दोन्ही इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. इंजिन 1 काही प्रमाणात सुरू झालं, मात्र इंजिन 2 पूर्णपणे रिकव्हर होऊ शकलं नाही. ऑटोस्टार्ट मोडही सुरू झाला होता, पण तरीही विमान हवेत स्थिर राहू शकलं नाही.

तपासादरम्यान Ram Air Turbine (RAT) बाहेर आलेला आढळला. हा एक आपत्कालीन उपकरण आहे, जो मुख्य वीजपुरवठा खंडीत झाल्यास बाहेर येतो. यावरून स्पष्ट होतं की, इंजिन बंद झाल्यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता.

सध्या या अपघाताचा अधिक तपशीलवार तपास सुरू आहे. इंजिन युनिटमध्ये दोष होता की एखादी सॉफ्टवेअर/सिस्टम चूक याबाबत AAIB अजून स्पष्ट निष्कर्षावर पोहोचलेली नाही. अंतिम अहवाल पुढील काही आठवड्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

News Title: Air India Crash Preliminary Report: Both Engines Shut Down Moments After Takeoff – Shocking Cockpit Conversation Revealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now