AIASL Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. एअर इंडियाकडून मोठी भरती राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया एअर इंडिया एयरपोर्ट सर्विसेज लिमिटेड (AIASL) यांच्याकडून राबवली जात आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्यामुळे जराही वेळ वाया न घालवता लगेच अर्ज करण्यास सुरुवात करावी. (AIASL Recruitment 2024)
एअर इंडिया एयरपोर्ट सर्विसेज लिमिटेडकडून जम्मू विमानतळावर ड्युटी ऑफिसर, हँडीमन, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि इतर पदे भरली जाणार आहेत. 26 ऑगस्ट 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी काहीच दिवश शिल्लक आहेत. ज्यांना नोकरीची गरज आहे, अशा युवकांनी लगेच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार हे aiasl.in या साईटवर भेट देऊ शकतात.
ही भरती प्रक्रिया 29 पदांसाठी सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू असणार आहे. दहावी पास तरुण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयाची अट काय?
या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय हे 28 ते 50 असावे. असे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना 18,849 ते 32,200 रूपये पगार दर महिन्याला मिळणार आहे. (AIASL Recruitment 2024)
अर्ज कुठे पाठवणार?
इच्छुक उमेदवारांनी अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना भरलेला अर्ज दुसरा मजला, GSD बिल्डिंग, एअर इंडिया कॉम्प्लेक्स, टर्मिनल – 2, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली – 110037 या पत्त्यावर पाठवावा लागेल. (AIASL Recruitment 2024)
News Title- AIASL Recruitment 2024
महत्त्वाच्या बातम्या –
रेल्वे विभागात नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
सुप्रियाच्या लाडक्या भावाने रंग बदलला, आता ते पिंक झाले
‘कांतारा’ ते KGF…70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत साउथ इंडस्ट्रीची बाजी; पाहा विजेत्यांची यादी
‘देवाची नव्हे तर नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!’ अजित पवारांचं वक्तव्य
‘आर्ची’ फेम रिंकू राजगुरूला मिळाला रियल लाईफ ‘परशा’?; म्हणाली, “माझ्या आयुष्यात.. “






