अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत काय घडलं? जाणून घ्या काय लागला निकाल

On: January 16, 2026 4:35 PM
Ahilyanagar Election Result
---Advertisement---

Ahilyanagar Election Result | राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून अनेक ठिकाणी भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, धुळे यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांनंतर आता अहिल्यानगरमधून सर्वात धक्कादायक निकाल समोर आला आहे. येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला एकही जागा मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्या राजकारणासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दुसरीकडे, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने अहिल्यानगरमध्ये दमदार कामगिरी करत मोठ्या संख्येने जागा जिंकल्या आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही येथे आपली ताकद दाखवत सत्ता समीकरणांवर प्रभाव टाकला आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांसमोर आत्मपरीक्षणाची वेळ आल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

अहिल्यानगरमध्ये नेमका निकाल काय? :

अहिल्यानगर महापालिकेच्या निकालानुसार भाजपाला एकूण 25 जागा मिळाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तब्बल 27 जागांवर विजय मिळवला आहे. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेला 10 जागा मिळाल्या असून ठाकरे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत, तर मनसेला खातेही उघडता आलेलं नाही. बसपाला एक जागा आणि एमआयएमला दोन जागा मिळाल्या आहेत.

या आकडेवारीनुसार अहिल्यानगरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना वरचढ ठरण्याची शक्यता असून अजित पवार गटही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, शरद पवार गटासाठी एकही जागा न मिळणं ही राजकीयदृष्ट्या अत्यंत धक्कादायक बाब मानली जात आहे. (Sharad Pawar setback)

Ahilyanagar Election Result | भाजप-शिंदे आघाडीची सरशी, विरोधकांसमोर आव्हान :

अहिल्यानगरसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेने वरचढ कामगिरी केली आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांमध्येही हीच परिस्थिती असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मोठे धक्के बसले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी विरोधकांना नव्याने रणनीती आखावी लागणार असल्याचं चित्र आहे.

एकंदरित, अहिल्यानगरचा निकाल हा शरद पवार गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात असून भाजप आणि सत्ताधारी आघाडीने राज्यातील शहरी राजकारणात आपली पकड अधिक मजबूत केल्याचं स्पष्ट झालं आहे.

News Title: Ahilyanagar Municipal Corporation Election Result 2026: Sharad Pawar Camp Draws Blank, BJP and Allies Dominate

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now