राज्यात 14 लाख नव्या मतदारांची भर, ‘इतके’ लाख नावे वगळली, जाणून घ्या संपूर्ण माहिती

On: September 19, 2025 10:26 AM
Maharashtra Election 2025
---Advertisement---

Maharashtra Voter List 2025 | राज्यातील मतदारसंख्येत सात महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. 27 नोव्हेंबर 2024 ते 30 जून 2025 या कालावधीत 18.80 लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली. त्याच वेळी 4.09 लाख मतदारांची नावे वगळली गेली असून, अंतिमतः 14.71 लाख नव्या मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण मतदारसंख्या आता 9.84 कोटींवर पोहोचली आहे. (Maharashtra Voter List 2025)

विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारवाढीवरून विरोधकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी झालेली ही वाढ अधिकृत स्वरूपात नोंदली गेल्याने ती आगामी निवडणुकांवर थेट परिणाम करणारी ठरणार आहे.

अद्ययावत यादी स्थानिक निवडणुकांसाठी लागू :

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पूर्वी स्थानिक निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकीतील मतदार यादी वापरण्याचा विचार होता. मात्र आता 1 जुलै 2025 पर्यंत अद्ययावत झालेली यादीच अंतिम मानली जाणार आहे. कारण मतदार नोंदणी ही सतत सुरू असणारी प्रक्रिया असल्याने अद्ययावत आकडेवारीच ग्राह्य धरली जाईल. (Maharashtra Voter List 2025)

नव्या मतदारांपैकी 1.96 लाख मतदार घरबदलामुळे नव्याने नोंदवले गेले आहेत. पुणे (32,031), ठाणे (27,386) आणि मुंबई उपनगर (25,831) या जिल्ह्यांमध्ये घरबदलामुळे सर्वाधिक नोंदणी झाली आहे. (Maharashtra Voter List 2025)

Maharashtra Voter List 2025 | सर्वाधिक मतदार वगळले गेलेले जिल्हे :

ठाणे : 45,800

मुंबई उपनगरे : 44,172

पुणे : 43,961

नाशिक : 35,479

जळगाव : 26,639

सर्वाधिक मतदार वाढलेले जिल्हे :

ठाणे : 2,25,866

पुणे : 1,82,490

पालघर : 97,100

मुंबई उपनगरे : 95,630

नागपूर : 70,693

सर्वाधिक मतदार असलेले जिल्हे :

पुणे : 90,32,080

मुंबई उपनगरे : 81,77,728

ठाणे : 74,55,205

नाशिक : 51,28,974

नागपूर : 45,96,690

News Title: Maharashtra Voter List Update: 14.7 Lakh New Voters Added, 4 Lakh Names Removed; District-Wise Details

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now