‘बाप बाप होता है’; विजयानंतर धर्मरावबाबा आत्रामांनी लेकीला सुनावलं

On: November 23, 2024 5:55 PM
Maharashtra Assembly Result 2024
---Advertisement---

Maharashtra Assembly Result 2024 | गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धर्मराव आत्राम यांचा एकतर्फी विजय झाला. त्यानंतर मोठा जल्लोष आत्राम व त्यांच्या समर्थकांनी केला. निकाल जाहीर झाल्यानंतर धर्मराव आत्राम हे जल्लोषात डान्स करत होते.

धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम रिंगणात होती. या लढतीत धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय (Maharashtra Assembly Result 2024)  झाला. त्यानंतर बाप बाप होता है, अशी प्रतिक्रिया धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे.

दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकाच कुटुंबातील असणाऱ्या या लढतीत प्रचार दरम्यान अनेक नाट्य झाली होती. धर्मराबाबा यांनी मुलीवर अनेक आरोपही केले होते.

निवडणुकीआधी भाग्यश्री आत्राम यांनी ‘घड्याळ’ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. बापलेक आमनेसामने आले होते. विधानसभा निवडणुकीत लेक थेट बापाविरूद्ध उभी ठाकली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

लातूर शहरात मोठी उलथापालथ; देशमुख कुटुंबाला मोठा धक्का

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार, शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर

राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरेंचा दारूण पराभव

288 मतदारसंघांचा निकाल पाहा एकाच ठिकाणी, फक्त एका क्लिकवर

निकालानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now