‘विजय झाला, आता शांत राहा!’, जरांगे पाटलांनी मराठ्यांना असं आवाहन का केलं?

On: September 3, 2025 1:01 PM
manoj jarange
---Advertisement---

Maratha GR | मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण छेडून मोठा विजय मिळवणारे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, या लढ्याचं संपूर्ण श्रेय मराठा समाजालाच जातं आणि स्वतः ते फक्त एक नाममात्र प्रतिनिधी होते. “माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली आहे. अनेक शतकांपासून प्रतीक्षेत असलेलं यश अखेर समाजाच्या पदरात पडलं आहे,” असं ते म्हणाले.

जीआरचं महत्त्व अधोरेखित :

जरांगे म्हणाले की, “१८८१ साली सरकारने मराठ्यांच्या हिताची एकही ओळ लिहिली नव्हती. स्वातंत्र्याला ७५-७६ वर्षं झाली, तरी गॅझेटियरमध्ये मराठ्यांचा हक्क नमूद नव्हता. त्यामुळे जीआर निघणं अत्यावश्यक होतं.” त्यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचं स्पष्ट केलं. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठीच गॅझेटियर लागू करणं गरजेचं होतं, असंही त्यांनी नमूद केलं.

मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी मराठा समाजाला आवाहन केलं की, “फक्त संयम ठेवा, शांतता ठेवा. एखाद्या विदूषक किंवा अविचारी माणसावर विश्वास ठेऊन आपला संयम ढळू देऊ नका.” त्यांनी टोळ्या उठून नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करतील, पण समाजाने त्याकडे दुर्लक्ष करून एकजूट कायम ठेवावी, असं सांगितलं.

Maratha GR | संयम आणि शांततेचं आवाहन

जरांगे पाटील यांनी सूचक शब्दांत राजकीय पक्षांवर टीका करताना म्हटलं की, “निर्णय घेताना मी एकटा नसतो.

माझ्यासोबत सात कोटी गोरगरीब जनता असते. काहींचं पोट दुखतंय कारण त्यांच्या हातून आरक्षणाचं राजकारण निसटून गेलं आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की, मराठा समाजाच्या भवितव्यावर कोणत्याही नकारात्मक शक्तींना परिणाम करू दिला जाणार नाही.

News Title: After Successful Protest, Manoj Jarange Patil Appeals to Marathas: “Stay Calm, Don’t Lose Faith”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now