लाडकी बहीण योजनेसंदर्भात फडणवीस सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

On: January 2, 2025 4:45 PM
Ladki Bahini Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana l राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेचा राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. कारण या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा 1500 रुपये दिले जात आहेत. अशातच आता या योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरतपासणी होणार! :

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा फायदा झाला आहे. मात्र आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची फेरतपासणी होणार आहे. यासंदर्भात अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. कारण लाडकी बहीणच्या योजनेचा गैरवापर करून पैसे घेतले असल्याच्या तक्रारी ज्या भागांमधून आल्या आहेत त्या भागातील फेरतपासणी सध्या होत आहे.

मात्र आता सगळ्याच भागातील फेरतपासणी होणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे अद्यापही काही अर्जांची छाननी होण्याचं काम बाकी आहे. मात्र त्या अर्जांची देखील छाननी काटेकोर पद्धतीनं होणार आहे.

Ladki Bahin Yojana l लाडकी बहीण योजनेची पात्रता काय आहे? :

– महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
– राज्यातील विवाहीत, घटस्फोटीत, विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.
– किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण असावीत.
– लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते असावे.
– लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

News Title : Aditi Tatkare on Ladki Bahini Yojana

महत्त्वाच्या बातम्या-

संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठाकरे गटाने केली सर्वात मोठी मागणी!

अजितदादांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी! शरद पवारांच्या नेत्याचा गंभीर आरोप

भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

छगन भुजबळ भाजपमध्ये कधी प्रवेश करणार? महत्वाची माहिती समोर

सरपंच हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले देशाबाहेर फरार?, मोठी अपडेट समोर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now