Aditi Rao Hydari | अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिने नुकतीच प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) यांच्या व्ह्लॉगमध्ये हजेरी लावली. दोघींनी मिळून अदितीचं आवडतं हैदराबादी डिश ‘खगीना’ बनवलं आणि गप्पांचा फड रंगला. यावेळी अदितीने अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) याच्याशी लग्न करण्याचा निर्णय किती सहज घेतला याबद्दल खुलासा केला.
सिद्धार्थबद्दल काय म्हणाली अदिती?
फराह खानने अदितीला विचारलं की, “तुला नेमकं कधी वाटलं की तू सिद्धार्थशी लग्न करावं?” यावर अदितीने पटकन उत्तर दिलं, “अगं बाप रे, मला क्षणभरही विचार करावा लागला नाही. तो खूप मजेदार आणि चांगला माणूस आहे. त्याच्यात काहीही बनावटपणा नाही. जसा दिसतो तसाच असतो आणि खूप प्रेमळ आहे.
View this post on Instagram
अदितीने पुढे सांगितलं की, “माझ्या आयुष्यातले जे लोक मला प्रिय आहेत त्यांना तो नेहमी आपलंसं करतो. तो सगळ्यांना एकत्र आणतो आणि हेच मला खूप आवडतं कारण मीही असंच वाढले आहे.” ती म्हणाली, “त्याचं कौतुक करताना मला कधीही खोटं बोलावं लागत नाही. तो खरंच चांगला गातो, नाचतो आणि उत्तम अभिनेता आहे.
‘हीरामंडी’ नंतर काहीतरी वेगळं होईल-
या गप्पांदरम्यान फराहने अदितीच्या करिअरवरही भाष्य केलं. फराहने सांगितलं की, अदितीने एकदा राउंडटेबलमध्ये सांगितलं होतं की तिला ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ (Heeramandi: The Diamond Bazaar) नंतर वाटलं की ती आता इंडस्ट्रीमध्ये “arrived” झाली आहे.
मात्र अदितीने वेगळं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, “मलाही काही वाटलं नाही…कारण ‘हीरामंडी’ नंतर लोकांनी खूप कौतुक केलं, मला वाटलं आता तर भन्नाट प्रोजेक्ट्स येतील. पण खरं तर काहीच नव्हतं, सगळी कडे drought! यावर फराहने मिश्किलपणे उत्तर दिलं, “म्हणूनच तू लग्न करून टाकलं!” यावर अदितीने हसून मान्य केलं, “खरंच. आम्हाला आमचं काम आणि लग्न यामध्ये बॅलन्स करावं लागलं.”
फराहने सांगितलं की अदिती आणि सिद्धार्थचं लग्न दोन रात्रींचं ग्रँड सेलिब्रेशन होतं. मात्र अदितीने स्पष्ट केलं की, “मी ते एका रात्रीतच संपवलं… कारण मला दुसऱ्या दिवशी ‘सिकंदर झोहरा जबीन’चं शूट होतं.”






