सकाळी लायसन्स रिव्हॉल्व्हर घेऊन तो..; गोविंदाच्या मॅनेजरकडून सर्वात मोठा खुलासा!

On: October 1, 2024 11:18 AM
Actor Govinda was shot in leg said his manager
---Advertisement---

Actor Govinda | बॉलीवूड अभिनेता गोविंदा याच्या पायाला गोळी लागली आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर होऊन थेट त्याच्या पायात गोळी शिरली, यामुळे तो जखमी झाला आहे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास मुंबईत ही घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विविध प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. (Actor Govinda)

इतक्या पहाटे गोविंदा लायसन्स रिव्हॉल्व्हर घेऊन कुठे जात होता, त्याच्याकडून मिसफायर कसं झालं?, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. याबाबत आता गोविंदाच्या मॅनेजरकडून महत्वाचा खुलासा समोर आला आहे. अभिनेत्याच्या मॅनेजरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गोविंदा यांच्या मॅनेजरने दिली माहिती

काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय की, अभिनेता गोविंदा कोलकाताला निघाले होते. कोलकाताला जाण्याआधी ते आपलं रिव्हॉल्व्हर बॅगमध्ये ठेवत होते. मात्र, अचानक त्यांच्या हातातून रिव्हॉल्व्हर सुटलं आणि त्यातून निघालेली गोळी थेट त्यांच्या पायाला लागली, अशी प्रतिक्रिया गोविंदाच्या मॅनेजरने दिली आहे. (Actor Govinda)

गोविंदा सकाळी जुहू येथील त्यांच्या घरून विमानतळावर निघाले होते. त्यावेळी रिव्हॉल्व्हर बॅगेत ठेवताना त्यांच्याच हातातून रिव्हॉल्व्हरमधून निघालेली गोळी पायाला लागली. ही घटना घडली तेव्हा ते घरी एकटेच होते. या घटनेनंतर गोविंदाला तातडीने मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येथे गोविंदावर उपचार केले जात आहेत.

गोविंदाच्या पायाला लागली गोळी

सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्याच्या पायतून गोळी काढण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसही त्या ठिकाणी दाखल झाले होते. गोविंदा यांचं रिव्हॉल्व्हर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं असून आता पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र, या घटनेनंतर गोविंदा यांच्या कुटुंबाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (Actor Govinda)

चाहत्यांकडून या घटनेनंतर चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, गोविंदा इतक्या सकाळी कोलकाता येथे का जात होते?, त्यांनी सोबत रिव्हॉल्व्हर का ठेवली?, याबाबत अद्यापही संभ्रम आणि संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा यांचीच चर्चा आहे.

News Title – Actor Govinda was shot in leg said his manager

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

“उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवून आमदार होऊन दाखवावं”

“गरबा खेळायला येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र पाजा”; भाजप नेत्याचा अजब सल्ला

मोठी बातमी! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

दिवाळीपूर्वीच महागाईचा भडका! गॅस सिलिंडर महागले, काय आहेत नवे दर?

Join WhatsApp Group

Join Now