मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

On: October 1, 2024 10:13 AM
actor govinda injured in gun misfire bullet shot
---Advertisement---

Govinda | बॉलीवूड अभिनेता गोविंदा याच्याबाबबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेत्याच्या पायाला थेट गोळी लागली आहे. गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चाहते देखील या बातमीमुळे चिंतेत पडले आहेत. (Govinda)

गोविंदा घराबाहेर जात असताना त्याच्याकडे परवाना असलेली बंदुक तपासून पाहत होता. त्याचवेळी चुकून बंदुकीतून गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. या घटनेनंतर त्याला तातडीने मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येथे गोविंदावर उपचार केले जात आहेत.

गोविंदाच्या पायात शिरली गोळी

सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ही घटना नेमकी कशी घडली याबाबत आता वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. अभिनेता गोविंदा ही घटना घडली तेव्हा जुहू येथील बंगल्यावर एकटाच असल्याचं समोर येतंय. (Govinda)

गोविंदा पहाटे साडेपाच वाजता घाईगडबडीत बाहेर जात असताना त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरचे लॉक ओपन झाले. गाडीत बसताना रिव्हॉल्वरचा खटका चुकून दाबल गेला आणि बंदुकीची गोळी त्याच्या पायात शिरली, अशी माहिती आता समोर येत आहे. मात्र, घटना कशी घडली, याबाबत अद्यापही संभ्रम आणि संशयाचे वातावरण आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान शिंदे गटात प्रवेश

दरम्यान, अभिनेता गोविंदाने लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला होता. तेव्हा अभिनेता वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याने लोकसभा निवडणूक लढवली नाही. आता गोविंदा या घटनेमुळे चर्चेत आला आहे. (Govinda)

News Title – actor govinda injured in gun misfire bullet shot

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवून आमदार होऊन दाखवावं”

“गरबा खेळायला येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र पाजा”; भाजप नेत्याचा अजब सल्ला

मोठी बातमी! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

दिवाळीपूर्वीच महागाईचा भडका! गॅस सिलिंडर महागले, काय आहेत नवे दर?

बाप्पाच्या आशीर्वादाने महिन्याची सुरुवात, पाहा तुमच्या राशीभविष्यात आज काय लिहिलंय?

Join WhatsApp Group

Join Now