Actor Govinda | अभिनेता गोविंदा यांच्या पायाला त्यांच्या बंदुकीतून मिसफायर होऊन गोळी लागली आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईत पहाटे 5 वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. सध्या गोविंदा यांच्यावर मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशात त्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी महत्वाची अपडेट दिली आहे. (Actor Govinda )
सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर असून त्यांच्या पायातून गोळी काढण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसही त्या ठिकाणी दाखल झाले होते. गोविंदा यांचं रिव्हॉल्व्हर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं असून आता पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर चाहत्यांकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबतही खुलासा झाला आहे.
गोविंदा यांच्या पायातून गोळी काढली
अभिनेता गोविंदा यांच्या मॅनेजरने याबाबत मोठा खुलासा केला आहे. अभिनेता गोविंदा पहाटे कोलकाताला निघाले होते. कोलकाताला जाण्याआधी ते आपलं रिव्हॉल्व्हर बॅगमध्ये ठेवत होते. मात्र, अचानक त्यांच्या हातातून रिव्हॉल्व्हर सुटलं आणि त्यातून निघालेली गोळी थेट त्यांच्या पायाला लागली, असा खुलासा गोविंदाच्या मॅनेजरने केलाय.
गोविंदा सकाळी जुहू येथील त्यांच्या घरून विमानतळावर निघाले होते. त्यावेळी रिव्हॉल्व्हर बॅगेत ठेवताना त्यांच्याच हातातून रिव्हॉल्व्हरमधून निघालेली गोळी पायाला लागली. ही घटना घडली तेव्हा ते एकटेच घरी होते. नंतर त्यांनी जवळच्या नातेवाईकांना फोन केला, त्यानंतर गोविंदाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Actor Govinda )
गोविंदाच्या मुलीकडून प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा यांना सध्या क्रिटी केअर रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात (ICU) ठेवण्यात आले आहे. गोविंदा यांच्या कुटुंबाकडूनही या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “माझ्या वडिलांची प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली आहे. पायाला गोळी लागल्यानंतर माझ्या वडिलांवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.”, असं गोविंदा यांची मुलगी टीना अहुजा यांनी सांगितलं आहे.
गोविंदा यांना आणखी 24 तास आयसीयू कक्षात (ICU) ठेवले जाईल. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमधील सुधारणा पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं जातंय. डॉक्टरांचे पथक गोविंदा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असं सांगितलं असल्याचं टीना अहुजा यांनी म्हटलंय. (Actor Govinda )
News Title – Actor Govinda Big Health Update
महत्वाच्या बातम्या-
सकाळी लायसन्स रिव्हॉल्व्हर घेऊन तो..; गोविंदाच्या मॅनेजरकडून सर्वात मोठा खुलासा!
पुणे जिल्ह्यात रात्रीचे फिरतात संशयित ड्रोन? नागरिकांमध्ये पसरली दहशद
मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
“उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवून आमदार होऊन दाखवावं”
“गरबा खेळायला येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र पाजा”; भाजप नेत्याचा अजब सल्ला






