Actor Dilip Shankar | सिनेसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आलाय. मल्याळम चित्रपट आणि टीव्ही अभिनेता दिलीप शंकर यांचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ते तिरुअनंतपुरममधील वनरोज जंक्शन परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. (Actor Dilip Shankar)
दिलीप शंकर यांच्या मृत्यूमुळे मल्याळम सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या वृत्ताने चाहते व त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. काही मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप शंकर हे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमधील एका स्टाफने सर्वप्रथम अभिनेत्याचा मृतदेह बघितला. या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली असून पुढील तपास केला जातोय.
मल्याळम अभिनेत्याचा मृतदेह आढळला
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पंचाग्नी’ नामक टीव्ही शोच्या चित्रिकरणासाठी गेल्या चार दिवसांपासून दिलीप शंकर हे वनरोज जंक्शन परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. अशात त्यांचा थेट मृतदेह आढळल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला?, की त्यांच्यासोबत घातपात झाला?, याबाबत आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.
काही मीडिया रिपोर्टमध्ये हॉटेल स्टाफकडून अभिनेत्याबाबत विविध माहिती देण्यात आली. दिलीप शंकर (Actor Dilip Shankar) हे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या रूमच्या बाहेर निघाले नव्हते.रविवारी जेव्हा त्यांच्या रूममधून वास येऊ लागला तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रूम उघडून तपास केला. याचवेळी दिलीप शंकर हे मृत अवस्थेमध्ये आढळून आले.
दिलीप शंकर यांचे टीव्ही शो व चित्रपट-
यानंतर हॉटेलकडून त्वरित पोलिसांना माहिती देण्यात आली. अभिनेत्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अद्याप मृत्यूचे खरे कारण समोर आले नाही. अभिनेत्यासोबत काम करणारे दिग्दर्शक मनोज यांनी सांगितले की, चित्रिकरणासाठी दोन दिवसांचा ब्रेक देण्यात आला होता. मात्र यादरम्यान दिलीप यांनी त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याच्या फोन, मेसेजला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांचा थेट मृतदेह आढळून आला.
दरम्यान, दिलीप शंकर (Actor Dilip Shankar) हे मल्याळम चित्रपट आणि टीव्ही जगतातले एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी काम केलेले सुंदरी, पंचाग्नि हे टीव्ही शो हीट ठरले आहेत.तसेच त्यांनी ‘चप्पा कुरीश’,‘नॉर्थ 24’ अशा काही चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत.
News Title : Actor Dilip Shankar dead body found in hotel
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात मोठी बातमी! वाल्मिक कराड कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर सरेंडर होणार?
ठाकरे गटाला मोठं खिंडार, तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
आज सोमवती अमावस्या, भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!
संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण, राष्ट्रवादीची युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणेचं काय कनेक्शन?
मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं नाव आल्याने मोठी खळबळ






