फरार निलेश घायवळचा मोठा डाव! थेट हायकोर्टात धाव, ‘या’ मागणीने पोलीसही चक्रावले!

On: October 15, 2025 12:21 PM
Nilesh Ghaiwal
---Advertisement---

Nilesh Ghaiwal | कोथरुड गोळीबार प्रकरणातील फरार गुंड नीलेश घायवळने (Nilesh Ghaiwal) मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर न्यायालयाने प्राथमिक सुनावणी घेत पुढील प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले असून, पुढील सुनावणी शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

कधीपासून परदेशात असल्याचा दावा :

घायवळने आपल्या याचिकेत असा दावा केला आहे की, कोथरुड येथील गोळीबाराच्या दिवशी तो पुण्यात नव्हता. त्याने नमूद केले की, “नऊ सप्टेंबरपासूनच मी परदेशात आहे. या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही.” त्यामुळे त्याच्याविरुद्ध नोंदवलेला गुन्हा “माध्यमप्रणीत” असल्याचा आरोपही त्याने केला आहे. त्याने पुढे म्हटले आहे की, हा गुन्हा दबावाखाली दाखल करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे माझ्याविरोधात झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचे घायवळचे म्हणणे आहे. (Nilesh Ghaiwal case)

त्याचबरोबर, अटकेपासून संरक्षण देण्याची मागणीही त्याने आपल्या याचिकेत केली आहे. घायवळच्या या युक्तिवादावर न्यायालयाने प्राथमिक आक्षेप नोंदवला. न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने “गुन्हा रद्द करण्याची मागणी” ऐवजी “अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करा” असे घायवळला सुचवले.

Nilesh Ghaiwal | न्यायालयाची दखल आणि पुढील सुनावणी :

न्यायालयाच्या या सूचनेला मान्यता देत घायवळने (Nilesh Ghaiwal case) आपल्या याचिकेत योग्य सुधारणा करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने त्याची विनंती मान्य केली असून, सुधारित याचिकेवर पुढील सुनावणी शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या प्रकरणात पोलिसांनी घायवळविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्याच्या टोळीच्या हालचालींमुळे पुण्यातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयीन निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, घायवळच्या याचिकेकडे कायदेतज्ज्ञ आणि पोलीस विभागाचेही लक्ष लागले आहे. पुढील सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Title- Absconding Nilesh Ghaywal moves High Court; Demand made to High Court ‘for this’

Join WhatsApp Group

Join Now