अभिषेक बच्चनकडून पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाला,”मला माहित होतं की ऐश्वर्या…”

On: November 25, 2024 8:01 PM
Abhishek Bachchan
---Advertisement---

Abhishek Bachchan | बाॅलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून चर्चेत असणारे अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटाबद्दल बोलंल जात होतं. तर दुसरीकडे, अभिषेकचा आय वाॅन्ट टू टाॅक या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. असं असलं तरी मात्र, या चित्रपटाचं कलेक्शन खूपच कमी आलं आहे. या चित्रपटात आजारी बाबा आणि मुलीच्या नात्याबद्दल सांगण्यात आलं आहे. यावर बोलत असताना अभिषेकने मुलगी आराध्याबद्दल सांगितलं आहे.

ऐश्वर्या आराध्यासोबत –

एका मुलाखतीत बोलत असताना अभिषेकने (Abhishek Bachchan) ऐश्वर्याबद्दल वक्तव्य केलं. त्याने केलेलं हे विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. आय वाॅन्ट टू टाॅकचे दिग्दर्शक शूजित सरकार यांनी जया बच्चन यांनी मुलांसाठी केलेल्या त्यागाकडे लक्ष वेधलं. त्याचवेळी अभिषेकने त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचा उल्लेख केला. मी नशीबवान आहे की मला बाहेर जाऊन चित्रपट करायला मिळतात. कारण मला माहित आहे की ऐश्वर्या आराध्यासोबत घरी आहे आणि त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानतो.

मी आदराने बोलतोय-

आई-बाबा झाल्यावर तुमची मुलं तुम्हाला खूप प्रेरणा देतात. गरज असेल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी एका पायावर पर्वत चढू शकता. खासकरून सर्व माता व महिलांबद्दल मी आदराने बोलतोय. कारण त्या जे करतात ते कोणीच करू शकत नाही. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यामध्ये (Abhishek Bachchan) अनेक वेळा मतभेद झाले होते. मात्र, आता या दोघांमध्ये कशावरुन खटके उडत आहेत. याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान, अभिषेकने त्याची एंगेजमेंट रिंग देखील काढली आहे. त्यामुळे अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत.

News Title : Abhishek Bachchan talks about aishwarya rai

महत्त्वाच्या बातम्या-

“मला त्याच्यासोबत झोपायला…”, सई ताम्हणकरच्या खुलाशाने खळबळ

‘हे’ 20 मंत्री घेणार शपथ?, सर्वात मोठी अपडेट समोर

अजित पवारांचा ‘हा’ आमदार शरद पवारांच्या भेटीला, कारण आलं समोर

महाराष्ट्रात थंडी वाढणार की कमी होणार? IMD ने वर्तवला अंदाज

पुढील सहा महिन्यांत पुन्हा निवडणुका होणार?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now