सगळ्यांसमोर अभिषेकने ऐश्वर्यासोबत केलं असं काही…; सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल!

On: December 19, 2024 8:44 PM
abhishek bachchan
---Advertisement---

Abhishek Bachchan | बाॅलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून चर्चेत असणारे अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटाबद्दल बोललं जात होतं. एवढंच नाही तर, काही दिवसांपूर्वी अभिषेक एका बाॅलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय अशा देखील चर्चा सुरु होत्या. मात्र, त्यावर बच्चन कुटुंब किंवा बाॅलिवूड अभिनेत्री यापैकी कोणीही भाष्य केलेलं नाहीये. दरम्यान, आता अभिषेक आणि ऐश्वर्याचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

अनेक कार्यक्रमांमध्ये अभिषेक (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या एकत्रीत दिसतात, मात्र दोघे वेगवेगळ्या गाड्यांमधून एन्ट्री करत असतात. त्यामुळे नेटकरी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करत आहेत. दरम्यान, नुकताच सोशल मीडियावर अभिषेक आणि ऐश्वर्याचा नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अंबानींच्या एका कार्यक्रमात बिग बी, ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली. यावेळेस त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ-

कार्यक्रमाला जात असताना अभिषेकने ऐश्वर्याला सर्वांसमोर संरक्षण दिलं आहे. यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्स पाऊस पाडला आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

अभिषेक बच्चन, अभिनेत्री निम्रत कौर हिला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नाही तर, सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरु होत्या. निम्रत आणि अभिषेक (Abhishek Bachchan) यांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. चर्चा रंगल्यानंतर निम्रतला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘लंचबॉक्स’ सारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री निम्रत कौर आहे.

News Title: abhishek bachchan protect aishwarya rai

महत्त्वाच्या बातम्या –

सासऱ्याने जावयावर केला अ‍ॅसिड हल्ला! कारण ठरलं हनीमूनचं…

… तर मग नव्या मंत्र्यांनी काय करायचं?; शिंदे गटाच्या आमदाराचा संतप्त सवाल

अमित शाहांच्या वक्तव्याने वाद, आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन

“वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये…”; आमदार क्षीरसागर कडाडले

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now