“..याची किंमत मोजावी लागली”; घटस्फोटाच्या चर्चेवर अखेर अभिषेकनं सोडलं मौन

On: August 12, 2024 5:04 PM
Abhishek Bachchan opens up on divorce talk
---Advertisement---

Abhishek Bachchan | बीग-बी अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद-विवाद असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहेत. पाहायला गेलं तर बच्चन कुटुंबातील कुणीही याबाबत अधिकृत असं काहीच सांगितलं नाहीये. स्वतः ऐश्वर्या आणि अभिषेकने सुद्धा यावर काहीच भाष्य केलं नाहीये. (Abhishek Bachchan) 

मात्र, ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमध्ये बच्चन कुटुंबापासून विभक्त दिसून आली आहे. बीग-बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, लेक श्वेता आणि अभिषेक बच्चन हे कुठेही सोबत स्पॉट होतात. तर, ऐश्वर्या मात्र नेहमीच लेक आराध्यासोबत (Aishwarya Rai ) हजेरी लावत असते.

काय म्हणाला अभिषेक बच्चन?

नुकताच अभिषेक हा पॅरिसमध्ये सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी गेला होता. मात्र, यावेळी त्याच्यासोबत पत्नी ऐश्वर्या नव्हती. यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता या सर्व चर्चेवर अभिषेकने (Abhishek Bachchan) अखेर मौन सोडलं आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना अभिषेकने घटस्फोटाबाबत मौन सोडलं आहे. त्याला ऐश्वर्या राय बच्चनसोबत घटस्फोटाच्या अफवांवर विचारण्यात आले होते. त्यावर अभिषेकने आपली अंगठी दाखवली आणि आपण अद्याप आपण विवाहित असल्याचे स्पष्ट केले. तसेच, याबाबत विनाकारण एवढ्या चर्चा केल्या जात आहेत. एक सेलिब्रिटी म्हणून आम्हाला या चर्चांची किंमत मोजावी लागली असल्याचं देखील अभिषेक म्हणाला.

ऐश्वर्या-अभिषेक यांच्यात सगळं काही आलबेल

“या चर्चेला प्रमाणापेक्षा अधिक हवा दिली. तुम्ही असे का करता ते मला माहिती आहे. तुम्हाला काही बातम्या द्यायच्या असतात, हे पण ठीक आहे. आम्ही सेलिब्रिटी आहोत, त्याचा परिणाम होतो. पण, मी अजूनही विवाहित आहे”, असं अभिषेक बच्चन म्हणाला.

दरम्यान, अभिषेक (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला आता जवळपास 17 वर्षे झाली आहेत. त्यांना आराध्या बच्चन ही मुलगी देखील आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात बिनसल्याच्या चर्चा होत आहेत. मात्र, आता अभिषेकने या मुलाखतीमध्ये या सर्व चर्चेवर मौन सोडलं आहे. त्यामुळे या चर्चा फक्त अफवा असल्याचं यामुळे सिद्ध झालं आहे.

News Title :  Abhishek Bachchan opens up on divorce talk

महत्त्वाच्या बातम्या-

गडकरींच्या बालेकिल्ल्यातच मनसेचा राडा; आता थेट टोलनाकाच फोडला

शेअर बाजारातील मोठ्या घडामोडीनंतर सोन्याचे दर काय?

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; ऐन श्रावणात भाज्यांचे दर भिडले गगनाला

“राहुल गांधी अत्यंत खतरनाक, विध्वंसक असून ते कधीच पंतप्रधान..”; कंगना रनौतचा संताप

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्यासाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now