Abhishek Aishwarya Divorce | बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अफवांचा भडिमार सुरु होता. अनेकांनी त्यांच्या विभक्त होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र या चर्चांवर दोघांनीच मौन बाळगलं होतं. अखेर अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Abhishek Aishwarya Divorce)
मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “पूर्वी माझ्याबद्दल काहीही लिहिलं गेलं तरी त्याचा माझ्यावर परिणाम होत नव्हता. पण आता मी एक पती, एक बाप आहे. माझं कुटुंब आहे. त्यांच्याशी संबंधित खोट्या बातम्या वाचून मी अस्वस्थ होतो.” अशा अफवांमुळे मानसिक त्रास होतो, असंही त्याने नमूद केलं.
मी काहीही स्पष्ट केलं तरी लोक ऐकणार नाहीत :
अभिषेकने असंही म्हटलं की, “मी काहीही स्पष्ट केलं तरी लोक ऐकणार नाहीत. कारण लोकांना फक्त सनसनाटी गोष्टी वाचायच्या असतात. त्यांना सत्यापेक्षा गॉसिप हवी असते. त्यामुळे मी मौन बाळगणंच पसंत केलं.” त्यामुळे अनेक महिने तो या चर्चांकडे दुर्लक्ष करत राहिला, असं स्पष्ट करताना अभिषेकचा संयमी स्वभाव पुन्हा एकदा दिसून आला.
या मुलाखतीत त्याने सोशल मीडियावरील ट्रोलिंगचाही उल्लेख केला. “एकदा एका ट्रोलने माझ्या पोस्टवर अपमानास्पद कमेंट केली होती. माझा मित्र सिकंदर खेरने त्याला थेट समोर येण्याचं आव्हान दिलं. मी म्हणतो, तुम्ही समोरासमोर काही बोललात, तर त्यात प्रामाणिकपणा असतो आणि मी त्याचा सन्मान करतो,” असं अभिषेकने सांगितलं. (Abhishek Aishwarya Divorce)
Abhishek Aishwarya Divorce | अभिषेकच्या भूमिकेवर प्रेक्षकांची उत्सुकता :
अभिषेक लवकरच ‘कालिधर लपटा’ या थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 4 जुलै 2025 रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चर्चाही सध्या जोरात सुरू असून, अभिषेकच्या भूमिकेवर प्रेक्षकांची उत्सुकता आहे. (Aishwarya Rai Bachchan)
अखेर अभिषेक बच्चनच्या या स्पष्ट आणि प्रामाणिक वक्तव्यामुळे घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून, सोशल मीडियावरील गैरसमज दूर होतील अशी अपेक्षा आहे. अभिषेक-ऐश्वर्या यांचं नातं अजूनही मजबूत असल्याचा संकेतही त्याच्या बोलण्यातून स्पष्ट झाला आहे.






