अखेर अभिषेकने ऐश्वर्यावर भाष्य केलं, चर्चांना उधाण

On: November 25, 2024 2:33 PM
Abhishek Bachchan
---Advertisement---

Abhishek Bachchan l अभिनेता अभिषेक बच्चन हा सध्या त्याच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या सिनेमात अभिषेक एका आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. परंतु, आता अभिषेक हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कारण अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहेत.

अभिषेक बच्चनने ऐश्वर्याचं कौतुक केलं :

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत भाष्य केलं नाही. पण या सगळ्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने नुकतच ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. तसेच अभिषेकने तिचे आभार देखील मानले आहेत. आराध्यासाठी ऐश्वर्या घरी असते, म्हणूनच मी काम करु शकतो असं देखील अभिषेकने म्हटलं आहे.

अभिषेक पुढे म्हणाला की, मी खरंच खूप भाग्यवान आहे की, मला बाहेर जाऊन सिनेमाकरण्याची संधी मिळत आहे. कारण मला माहित आहे की, आराध्यासोबत घरी ऐश्वर्या आहेत. त्यासाठी मी तिचे खरंच खूप आभार मानतो. तसेच मुलं तुम्हाला कधीच कोणती तिसरी व्यक्ती म्हणून पाहत नाहीत. कारण ते कायमच तुम्हाला त्यांच्या आयुष्यातली पहिली व्यक्ती म्हणूनच पाहत असतात.

Abhishek Bachchan l आराध्याच्या बर्थडेला अभिषेक गैरहजर :

अवघ्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. मात्र त्यानंतर या जोडप्याने या सर्व अफवांबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

अशातच ऐश्वर्या बच्चन आणि मुलगी आराध्या या दोघी दिवंगत वडील कृष्णराज राय यांची जयंती साजरी करण्यासाठी तिची आई वृंदा राय यांना भेटायला गेली होती. मात्र त्यावेळी ऐश्वर्याने कुटुंबासोबत वेळ घालवला होता. परंतु, यावेळी ऐश्वर्याने आराध्याचा वाढदिवस देखील साजरा केला. परंतु, या सेलिब्रेशनमध्ये ती एकटीच होती, कारण यावेळी अभिषेक बच्चन दिसला नाही.

News Title – Abhishek Bachchan & Aishwarya Rai Bachchan News

महत्त्वाच्या बातम्या-

निवडणूक होताच शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका!

निकालाबाबत मनोज जरांगेंचा खळबळजनक खुलासा!

…तर त्यावेळी माझी चूक झाली; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

‘अरे ढाण्या थोडक्यात वाचलास’, अन् रोहित पवार अजितदादांच्या पायाच पडले; पाहा Video

‘मी कटाचा बळी ठरलो’; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now