धक्कादायक!पिस्तूल साफ करताना स्वतःवरच झाडली गोळी, आमदाराचा जागीच मृत्यू

On: January 11, 2025 9:07 AM
NEET Exam Tragedy
---Advertisement---

AAP MLA Gurpreet Gogi Death | पंजाबमधील लुधियानामधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे आम आदमी पक्षाचे नेते आणि लुधियाना पश्चिम विधानसभेचे आमदार गुरप्रीत गोगी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी मध्यरात्री रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (AAP MLA Gurpreet Gogi Death)

आम आदमी पक्षाचे (आप) आमदार गुरप्रीत गोगी यांच्या निधनाबाबत त्यांच्या कुटुंबियांनी घातपाताची शंका व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गोळी लागल्यानंतर आमदाराला त्वरित डीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, येथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आमदार गुरप्रीत गोगी यांचा मृत्यू

आप आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांना त्यांच्या बेड रूममध्येच गोळी लागल्याची माहिती आहे. गोळीचा आवाज ऐकून आमदाराच्या पत्नीने डॉ. सुखचैन कौर या धावत बेडरूमकडे गेल्या आणि त्यांना समोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आमदार गुरप्रीत गोगी दिसून आले. त्यानंतर त्यांना ताबडतोब डीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आमदार गोगींवर त्यांच्याच परवानाधारक पिस्तूलाने गोळीबार झाल्याचे समजत आहे. मात्र, त्यांनी स्वतःवर गोळी झाडली की कुणीतरी त्यांच्यावर गोळीबार केला? याबाबत कोणतीच माहिती अजून समोर आली नाही. या घटनेमुळे हा घातपात आहे की अपघात? याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (AAP MLA Gurpreet Gogi Death)

चुकून स्वतःवरच झाडली गेली गोळी?

तर, कुटुंबामधील काही सदस्यांनी आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांनी चुकून स्वतःवर गोळी झाडली असं म्हटलं आहे. त्यांच्या डोक्यात गोळी लागली आहे. या घटनेचा पोलीस आता तपास करत आहेत. आमदाराचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

दरम्यान, गुरप्रीत बस्सी गोगी हे पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत ते येथून विजयी झाले होते. या निवडणुकीत त्यांना जवळपास 40 हजार मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार भारत भूषण दुसऱ्या क्रमांकावर होते, तर अकाली दलाचे महेशइंदर सिंग ग्रेवाल तिसऱ्या क्रमांकावर होते. (AAP MLA Gurpreet Gogi Death)

News Title : AAP MLA Gurpreet Gogi Death

महत्वाच्या बातम्या –

आज वर्षाच्या पहिल्या प्रदोषव्रताला राशीनुसार करा ‘हे’ उपाय; शनिदोष होईल दूर

आज शनिप्रदोष, ‘या’ राशींवर होणार थेट परिणाम; सतर्क राहावे अन्यथा…

पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यापासून ‘हे’ शेतकरी राहणार वंचित?

“पप्पा… आम्हाला माफ करा”, देशमुखांच्या लेकीने हंबरडा फोडला

मुन्नी मला घाबरत आहे?, सुरेश धस यांचा हल्लाबोल

Join WhatsApp Group

Join Now