आधारकार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर विसरलात तर घाबरू नका, अशाप्रकारे शोधा

On: August 19, 2024 12:37 PM
Aadhaar Card
---Advertisement---

Aadhar Card l आज आधार कार्ड हे भारतातील लोकांचे ओळखपत्र बनले आहे. आधार कार्ड ही नागरिकांची ओळख बनली आहे. आधार कार्ड जवळजवळ सर्वत्र वैध ओळखपत्र मानले जाते. अशास्थितीत मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये लिंक केला जातो, ज्यामुळे तुम्हाला मोबाईलवर अपडेट मिळत राहतात. पण अनेक वेळा वेगवेगळे मोबाईल नंबर वापरताना लोक हे विसरतात की त्यांनी कोणता नंबर आधारशी लिंक केला होता. अशा परिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की, तुम्ही आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर कोणता आहे.

अशाप्रकारे करा चेक :

UIDAI ही एक अधिकृत वेबसाइट आहे जी तुम्हाला आधारशी संबंधित कामे करण्यात मदत करते. आधारमधील लिंक क्रमांक जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला वरच्या बारमध्ये My Aadhaar वर जाऊन त्यावर क्लिक करावे लागेल येथे तुम्हाला आधार सेवा दिसेल.

त्यानंतर त्याखाली Verify Email/Mobile क्रमांक लिहिलेला असेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा अचूक भरा आणि सबमिट करावा लागेल. सबमिट वर क्लिक करताच आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरची माहिती तुमच्या समोर येईल.

Aadhar Card l तुम्ही वेगळ्या मोबाईल नंबरवरून देखील तपासू शकता :

कधी-कधी तुम्हाला दिसेल की तुम्ही एंटर केलेला नंबर आधीच पडताळलेला आहे. यानंतर, आधारशी लिंक नसलेला मोबाइल क्रमांक टाकल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर लिहिलेला संदेश दिसेल असे केल्याने तुम्ही वेगवेगळे नंबर टाकू शकता आणि कोणता मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे आणि कोणता नाही हे शोधू शकता.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आधारकार्ड अपडेट असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे.

News Title – Aadhar Card Mobile Number Link

महत्त्वाच्या बातम्या-

कलकत्ता बलात्कार प्रकरणानंतर अर्जुन कपूरने पुरूषांना दिला महत्वाचा सल्ला!

बहिणींनो! राखी बांधताना फक्त तीन गाठी मारा, काय आहे यामागचं कारण

कंगना रनौतचं महिलांबद्दल खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, “अशा मुली पुरुषांना..”

“एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण, फडणवीस अर्जुन तर शरद पवार शकुनी मामा”

सुप्रिया सुळेंनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण; अजितदादा नव्हे तर ‘या’ नेत्याला बांधली राखी

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now