Saksham Tate Murder Case | नांदेडमधील सक्षम ताटे हत्याकांडानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. प्रियसीच्या वडिलांनी आणि भावाने गोळ्या झाडून सक्षमची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ज्याच्याशी तीन वर्षांचे प्रेमसंबंध होते, तो अचानक या जगात नसल्याचे समजताच आचल मामीलवाड सक्षमच्या घरी धावली आणि तिने मृतदेहाशीच विवाह करण्याचा असामान्य निर्णय घेतला. तिचे रडणे पाहून उपस्थित सर्वच लोकांच्या अंगावर काटा आला.
सक्षमच्या मृतदेहासोबत हळद लावण्यापासून लग्नाच्या विधी करण्यापर्यंत आचलने केलेली कृती पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले. पण या सर्वांमध्ये तिने केलेले दावे अधिक धक्कादायक ठरले. सक्षमला तिच्या कुटुंबियांनी मुद्दाम गुन्हेगारी प्रतिमेत रंगवले असल्याचा दावा आचलने केला आहे. सक्षमवर तडीपारीची कारवाई झाली असली तरी, “तो गुन्हेगार नव्हता, त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले,” असे तिने स्पष्ट सांगितले. (Saksham Tate Murder Case)
आचलचा भावनिक कोसळलेला क्षण आणि निर्णय :
घटनेनंतर आचल सक्षमच्या घरी गेली आणि त्याच्या मृतदेहावर कोसळून तिने आपल्या प्रेमाचा शेवटचा श्वास जणू त्याच्यासोबत घेतला. मृतदेहासोबत लग्नाचा निर्णय कोणालाही धक्का देणारा होता. पण तिच्या मते, सक्षम हा तिचा पतीच होता आणि त्याच्यावरील तिचे प्रेम शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार होते. या सगळ्या गोंधळात आचलचा डाहो पाहून आसपासचे लोकही भावुक झाले.
तीने सार्वजनिकरीत्या सांगितले की, तिच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि सक्षमविषयी त्यांच्याकडे आधीपासूनच तिरस्कार होता. सक्षम आणि तिचे भाऊ मित्र होते, तो घरातही नियमित येत होता. पण प्रेमसंबंध कळल्यानंतर त्याच्या विरुद्ध घरच्यांनी कट रचला. “वर्षभरापूर्वी विनयभंगाची केस दाखल झाली, पण ती खोटी होती,” असे आचलने सांगितले.
Saksham Tate Murder Case | “चल आपण दोघे पळून जाऊ…” आचलचा मोठा खुलासा :
आचल म्हणाली की, घरच्यांच्या धमक्या आणि दबावामुळे ती मानसिकदृष्ट्या कोसळत होती. “मी सक्षमला सरळ सांगितले होते की चल आपण दोघे पळून जाऊ… मी तयार होते,” असे ती म्हणाली. पण स्वतःच्या प्रेमापेक्षाही आचलच्या वडिलांच्या प्रतिष्ठेला सक्षमने प्राधान्य दिले. “तुझ्या वडिलांची इज्जत मोठी आहे, आपण पळून जाऊ नको,” असे सक्षमने तिला सांगितले होते. (Aachal Mamilwad statement)
आता सक्षम ताटे हत्येची चर्चा राज्यभर रंगत असून, आचलने केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाला नवा वळण मिळाले आहे. दोन्ही कुटुंबांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपांमुळे तपास आणखी गुंतागुंतीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण आचलच्या भावनिक निवेदनामुळे या प्रकरणाच्या मागे दडलेले अनेक थर आता उघडकीस येत आहेत.






