Satish Wagh Murder : सतीश वाघ (Satish Wagh Murder) खून प्रकरणात रोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि मयत सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी हिने तपासादरम्यान एक खळबळजनक दावा केला आहे. तिने पती सतीश वाघ याच्यावरच गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मोहिनीचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा-
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिनीने सांगितले की, “सतीशचे बाहेर अनैतिक संबंध होते आणि तो माझा दहा वर्षांपासून छळ करत होता. हा सगळा प्रकार असह्य होता.” मोहिनीचा हा जबाब या प्रकरणाला वेगळे वळण देणारा ठरला आहे.
दरम्यान, या खून प्रकरणातील आणखी एक आरोपी अतिश जाधव याच्या धाराशिव येथील घरातून रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले आहेत. हे कपडे तपासासाठी महत्त्वपूर्ण पुरावा ठरणार आहेत.
अक्षयच्या बँक खात्यांची कसून चौकशी-
सतीश वाघ यांचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेली रक्कम नेमकी कुठून आली याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अक्षयची सर्व बँक खाती तपासण्यास सुरुवात केली आहे. यातून काही महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
बुधवारी (ता. २५) अटक करण्यात आलेल्या मोहिनीसह सर्व आरोपींना न्यायालयाने गुरुवारी (ता. २६) पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीदरम्यान पोलीस सर्व आरोपींची कसून चौकशी करून या प्रकरणाचा सखोल तपास करतील.
या खून प्रकरणाच्या तपासातून आणखी काय नवीन खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोहिनीच्या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, पोलीस आता सर्व बाजूने तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पंकूताई वाट वाकडी करून…’; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंना सवाल
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या?; अंजली दमानियांच्या खुलाशाने खळबळ!
सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने घेतला मोठा निर्णय!
प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने मनसे नेता आक्रमक, सुरेश धसांना झापलं
दुर्गप्रेमींनो ‘या’ किल्ल्यावर फिरायला जाणार असाल तर आत्ताच थांबा, 3 दिवस राहणार बंद!






