‘ही दोन औषधं लहान मुलांना देऊ नका’; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

On: January 12, 2023 11:31 AM
---Advertisement---

मुंबई | डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मारियॉन बायोटेक या कंपनीने निर्माण केलेल्या कफ सायरपच्या सेवनामुळे उझबेकिस्तानमध्ये 19 मुलांचा मृत्यू झाला होता. श्वसनाचा विकार जडल्यामुळे या मुलांचा मृत्यू (Death) झाला होता.

याच घटनेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने या कंपनीचे दोन कफ सिरप लहान मुलांना देऊ नये, असं आवाहन केले आहे.

मूळच्या उत्तर प्रदेशच्या मारयॉन बायोटेक कंपनीकडून Ambronol आणि DOK-1 Max या दोन कफ सिरपचे उत्पादन घेतलं जातं.

या फक सिरपची चाचणी केल्यानंतर यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल तसेच इथिलीन ग्लायकोल हे घटक योग्य प्रमाणात नसल्याचं समोर आलं आहे.

याच कारणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांना मारयॉन बायोटेक या कंपनीचे वरील दोन कफ सिरप देऊ नये, असं आवाहन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now