‘खासदाराची चड्डी सुद्धा…’; पोलीस अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटने पोलीस दलात खळबळ

On: January 5, 2025 6:55 PM
Sudarshan Ghule
---Advertisement---

Santosh Deshmukh | मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यात त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे यांच्यावर आरोप केले होते. त्याचमुळे गणेश मुंडे यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट केलीये. त्याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरूये.

बीडमधील पत्रकारांसाठी पोलीस अधीक्षकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आहेत. यात त्यांनी त्यांनी त्यावर पोस्ट करताना म्हटले की, मी पत्रकार परिषद घेतली तर या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही, अशा आशयाचा मेसेज केलाय.

पोलीस दलात खळबळ

या पोस्टमध्ये त्यांना खासदाराचे नाव घेतले नाही. त्यानंतर पत्रकारांनी समजनेवाले को इशारा कॉफी होता है, असे म्हणत बजरंग सोनवणे यांच्याकडे बोट दाखवलं आहे. गणेश मुंडे यांच्या या पोस्टमुळे पोलीस दल आणि राजकारण्यांत एकच खळबळ उडाली आहे.

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांवर आरोप केले होते. त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे या अधिकार्‍यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती. त्या कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट होतील, अशी चर्चा रंगली होती.

Capture

महत्त्वाच्या बातम्या- 

“भिकाऱ्यांची संख्या वाढली, साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा”

धस सुसाट, मौनी दादांनाही मधे ओढलं, फडणवीसही दम देईनात, कारण काय?

घटस्फोट झाल्यास चहलच्या बायकोला ‘इतक्या’ कोटींची पोटगी मिळणार?

हिवाळ्यात डोकं नेमकं का दुखतं?, ‘या’ डोकेदुखीवर वापरा हे रामबाण उपाय

प्रयागराज कुंभमेळ्यात ‘या’ बाबांनी वेधलं सर्वांचं लक्ष, तब्बल 32 वर्ष केली नाही अंघोळ!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now