‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चा नवा विक्रम, रुग्णांना 300 कोटीहून अधिक अर्थसहाय्य

On: August 2, 2024 3:33 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde | राज्य शासनाने सुरू केलेल्या वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे दोन वर्षात 35 हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात सरकारला यश आलं आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

वैद्यकीय सहाय्यता निधीचा नवा विक्रम

गोरगरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केलं जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले आहेत. वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने गेल्या 2 वर्षं 2 महिन्यामध्ये 36,000पेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना एकूण 301 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलं. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी , कर्करोगावरील शस्त्रक्रिया , केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया , सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात , विद्युत अपघात , भाजलेले रुग्ण , जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसडर पदी अवघ्या एक वर्षाच्या दुवा नावाच्या चिमुकलीची निवड करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील फहरीण मकुबाई आणि सादिक मकूबाई या मुस्लिम दांपत्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवघ्या 13 दिवसांच्या बाळाचे प्राण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लाखमोलाच्या मदतीमुळे वाचले होते. सहा महिन्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात सदर मुस्लिम दांपत्याने संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हातात बाळाला सुपूर्द करत मुख्यमंत्री महोदय यांच्या दुवामुळे बाळाचे प्राण वाचले असल्याने या चिमुकलीचे नाव दुवा ठेवणार असल्याची इच्छा प्रकट केली. तब्बल एक लाख लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या बाळाला हातात घेऊन सदरच चिमुकलीचे नाव दुवा ठेवत असल्याचे जाहीर केले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाहीत’; मिटकरींचा मनसे नेत्यांना इशारा

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा त्रस्त?, धक्कादायक सत्य आलं समोर

राज्य सरकारचा करंटेपणा, ॲालिम्पिकला जाण्यापूर्वी स्वप्निलला 50 लाखांची घोषणा करुन रुपयाही दिला नाही!

अटकेच्या भीतीने पूजा खेडकर परदेशी फरार?, मोठी अपडेट समोर

ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा महागलं, 10 ग्रॅमसाठी आता… 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now