‘विकासाचं राजकारण करायचं असेल, तरच मनोमिलन’, रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका

On: October 3, 2025 4:03 PM
Ramraje Naik Nimbalkar
---Advertisement---

Ramraje Naik Nimbalkar | “मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल, तरच मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल”, असे विधान विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे सध्या महायुतीत आहेत. त्यांच्यातील संघर्षाची चर्चा अनेकदा पाहायला मिळाली होती. सध्या रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर, रणजीतसिंह नाईक निंबाळकर भाजपमध्ये (Ranjitsingh Naik Nimbalkar) आहेत. ते काही दिवसांपूर्वी एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन होईल, असे म्हंटले जात होते. त्यासंदर्भात रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोमिलनाचा चेंडू रणजीत नाईक निंबाळकर यांच्या कोर्टात :

मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल. वरिष्ठांनी सांगितलं तर होईल. नाहीतर हे मनोमिलन होणार नाही. हा निर्णय लोकांच्या हातात आहे लोक ठरवतील, अशी प्रतिक्रिया देऊन रामराजे यांनी मनोमिलनाचा चेंडू रणजीत नाईक निंबाळकर यांच्या कडे ढकलला आहे. यामुळे रणजीत नाईक निंबाळकर यावर काय बोलतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मनोमिलन होणार की नाही याबाबत फलटणच्या व सर्व सामान्य जनतेच्या मनात उत्सुकता आहे. परंतू आता मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्यावर इकडून तिकडे व तिकडून इकडे येणाऱ्या नेत्यांची चांगलीच दमछाक झाली आहे.

Ramraje Naik Nimbalkar | दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर :

फलटण येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे एकाच व्यासपीठावर आले असता दोघांनी एकमेकांसोबत बोलणे टाळले होते. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या भाषणात, “रणजीत निंबाळकर आणि माझे भांडण आहे, मात्र दोघांनाही कुठे थांबायचे हे चांगले समजते. मतभेद असले तरच लोकशाही टिकते. हे वैयक्तिक भांडण नाही ज्याला त्याला आपली मते आहेत ते आपण मांडत असतो”, असे म्हणाले होते. मात्र त्यानंतर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात रामराजे यांच्या विषयी बोलणे टाळले होते.

रामराजे यांनी मनोमिलना बाबत वरिष्ठांनी सांगितले तर होईल, नाहीतर होणार नाही, असे सांगत दोन्ही गटांचे पक्षश्रेष्ठींची भूमिका महत्त्वाची आहे, असेही स्पष्ट केले.

News title : A consolation ball from Ramraje Naik Nimbalkar into Ranjitsinh Nimbalkar’s court

Join WhatsApp Group

Join Now