पुणे हादरलं! भररस्त्यावर तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; व्हिडीओ व्हायरल

On: October 1, 2025 12:35 PM
---Advertisement---

Pune News | विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका किरकोळ वादातून एका तरुणाने तरुणीला भर रस्त्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.

देशभरात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असताना, महिलांचा सन्मान आणि गौरव होत असताना पुण्यात मात्र एका तरुणीला निर्घृण मारहाण केल्याचं संतापजनक चित्र समोर आलं आहे. दानवाप्रमाणे एका तरुणाने त्या तरुणीवर हल्ला चढवला. परिसरातील नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला.

नेमकी घटना काय ?

दरम्यान, ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगर जाणाऱ्या मार्गावर घडली. मात्र, मारहाण करणारा तरुण नेमका कोण आहे आणि त्याचा संबंधित तरुणीशी काय संबंध आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीसानी सांगितले की, रात्री उशिरापर्यंत कुठली ही तक्रार प्राप्त झाली नाही . या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबद्दलही मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर परिसरात आणि सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

News Title :- Shocking! Young woman thrashed with kicks and punches on a busy Pune road; video goes viral

Join WhatsApp Group

Join Now