लातूर शहरात मोठी उलथापालथ; देशमुख कुटुंबाला मोठा धक्का

On: November 23, 2024 4:58 PM
---Advertisement---

Maharashtra Election Result 2024 | काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये धीरज देखमुख यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांचा पराभव झाला. तर लातूर शहर मधून अमित देशमुख हे फक्त 1800 मतांना आघाडीवर आहेत. त्यामुळे येथेही कांटे की टक्कर आहे.

मतमोजणी सुरू झाली तेव्हा या जागेवरून काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख आघाडीवर होते, तर मतमोजणीच्या सहाव्या फेरीत भाजपच्या डॉ अर्चना पाटील चाकूरकर पुढे गेल्या.

लातूर शहरात माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने काँग्रेसच्या विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्यात आले होते. अमित देशमुख हे येथून तीन वेळा आमदार आहेत. याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय. तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. बाळासाहेब थोरात सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, यावेळी मतदारांनी त्यांचा आमदार बदलला आहे .हे निकाल अतिशय धक्कादायक असल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरेंचा दारूण पराभव

288 मतदारसंघांचा निकाल पाहा एकाच ठिकाणी, फक्त एका क्लिकवर

निकालानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य!

काँग्रेसला मोठा धक्का; मुख्यमंत्रिपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या नेत्याचाच पराभव

मविआचे बडे नेतेही ठरले फेल, पाहा पराभूत उमेदवारांची यादी

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now