मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट!

On: January 16, 2025 5:22 PM
8th Pay Commission
---Advertisement---

8th Pay Commission l देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आज केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने केली महत्वाची घोषणा :

केंद्र सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच यासंदर्भात कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या सूचना देखील विचारात घेतल्या जाणार आहेत. अशातच दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही महत्वाची घोषणा केली आहे.

दरम्यान, देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे. तसेच या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला देखील मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक खुशखबरच आहे.

8th Pay Commission l महागाई भत्ता 53 टक्क्यांवर :

अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक चांगली बातमी दिली आहे. कारण आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्याने सर्व कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. याशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 53 टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक महिन्यांपासून आठव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत होते. आता सरकारने त्यांची प्रतिक्षा संपवली आहे.

तसेच यापूर्वी वेतन आयोग दर दहा वर्षांनी लागू केला जातो. यापूर्वी 2016 मध्ये वेतन आयोग लागू करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आता आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

News Title : 8th Pay Commission News

महत्वाच्या बातम्या-

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

पुण्यात सुसाट कंटेनरने तब्बल ‘इतक्या’ जणांना उडवले!

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली!

सैफवरील हल्ला पुर्वनियोजित कट?; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सैफच्या हल्ल्यानंतर करीना कपूरने दिली पहिली प्रतिक्रिया!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now