8th Pay Commission | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जानेवारी 2025 रोजी 8वा वेतन आयोग (8th Pay Commission) मंजूर केला आहे. या आयोगाच्या माध्यमातून 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 65 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांचे पुनरावलोकन केले जाणार आहे. 8व्या वेतन आयोगातील महत्त्वाचे बदल
वेतन श्रेणीतील मोठे बदल
सध्या वेतन स्तर 1 ते 18 पर्यंत आहे. 7व्या वेतन आयोगानुसार किमान वेतन ₹18,000 (Level 1) आणि जास्तीत जास्त ₹2,50,000 (Level 18) आहे.
नवीन प्रस्तावानुसार Level 1 ते Level 6 च्या वेतन श्रेणी एकत्र करण्याचा प्रस्ताव आहे.
प्रस्तावित वेतन बदल:
Level 1 (₹18,000) + Level 2 (₹19,900) → नवीन वेतन: ₹51,480 (Fitment Factor: 2.86)
Level 3 + Level 4 → नवीन वेतन: ₹72,930
Level 5 + Level 6 → नवीन वेतन: ₹1,01,244 या बदलामुळे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार असून वेतन संरचना अधिक सोपी होईल.
महागाई भत्ता आणि महागाई सवलत
DA आणि DR चे स्वयंचलित विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हे मंजूर झाल्यास, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन (Pension) मोठ्या प्रमाणात वाढेल. 8वा वेतन आयोग केव्हा लागू होणार? सरकार या महिन्यात 3-सदस्यीय वेतन आयोग पॅनेल स्थापन करेल.
पॅनेल पुढील 12 महिन्यांत अहवाल सादर करेल.
त्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेईल आणि वेतन वाढीच्या प्रस्तावास मंजुरी देईल.
या वेतन आयोगामुळे 1.2 कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतनात मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे.






