येरवडा ते कात्रज प्रवास होणार सुपरफास्ट, सरकारचा मोठा निर्णय

On: February 14, 2025 11:22 AM
Yerwada to Katraj
---Advertisement---

Yerwada to Katraj l शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज (Yerwada to Katraj) असा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग २० किलोमीटर लांबीचा असून, यासाठी सुमारे ८ हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. या मार्गाच्या एका किलोमीटरसाठी साधारणपणे ४०० कोटी रुपये खर्च येणार आहे.

सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार :

या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) (DPR) तयार करून तो राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) बैठकीत, ‘येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग ट्वीन टनेल (Twin Tunnel) पद्धतीने करावा आणि यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, तसेच या बाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा’, असे आदेश दिले होते.

Yerwada to Katraj l पूर्व-पश्चिम रस्ते अधिक, उत्तर-दक्षिण मार्ग कमी :

पुणे (Pune) महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr. Rajendra Bhosale) यांनी सांगितले, ‘पुणे शहरात पूर्व ते पश्चिम जोडणारे अनेक रस्ते आहेत, पण उत्तर ते दक्षिण जोडणारे मार्ग कमी आहेत. त्यामुळे पीएमआरडीएने (PMRDA) येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाचा प्रस्ताव ठेवला आहे.’

या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून, सविस्तर अभ्यास केला जाईल आणि अहवाल तयार करून राज्य सरकारकडे पाठविला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय होईल, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पाबाबत शंका :

काही वर्षांपूर्वी पुणे-मुंबई मार्गावर हायपर लूप (Hyper Loop) प्रकल्प करण्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र तो बारगळला. तसेच, शहरातील नदीमधून जलवाहतूक करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले होते, पण ती देखील कागदावरच राहिली. त्यामुळे येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तरी होणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

News Title: 8000 Crore Estimated for Yerwada to Katraj Underground Route

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now