DA Hike 2025 | केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त वेतनधारकांना सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 7 व्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या DA 55% आहे, तो आता वाढून 58% वर पोहोचणार आहे. (DA Hike 2025)
ऑक्टोबरमध्ये होणार घोषणा :
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार ऑक्टोबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात या वाढीची घोषणा करू शकते. ही वाढ जुलै 2025 पासून लागू होणार असून कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे थकीत (arrears) पैसे ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळणार आहेत.
DA Hike 2025 | वर्षातून दोनदा होते वाढ :
– जानेवारी-जून कालावधीसाठी घोषणा साधारणपणे होळीपूर्वी केली जाते.
– जुलै-डिसेंबर कालावधीसाठी घोषणा दिवाळीपूर्वी केली जाते.
यंदा दिवाळी 20-21 ऑक्टोबर रोजी आहे. त्यामुळे या अगोदरच DA वाढ जाहीर होण्याची खात्री आहे.
कसा ठरतो महागाई भत्ता? :
महागाई भत्त्याची गणना CPI-IW (औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक) यावर आधारित केली जाते. जुलै 2024 ते जून 2025 या कालावधीतील CPI-IW ची सरासरी 143.6 इतकी होती. त्यावरून नवीन DA 58% इतका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही वाढ 7 व्या वेतन आयोगांतर्गत शेवटची असणार आहे. कारण या आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे. पुढील वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचे लक्ष आता 8 व्या वेतन आयोगाकडे आहे.






