Life Tips | आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात, ज्या आपण नकळत इतरांसोबत शेअर करतो. पण याच गोष्टी कधी कधी आपल्या आयुष्यात अडथळा निर्माण करतात. कारण इतरांच्या मनात निर्माण होणारी ईर्ष्या (Jealousy) आणि नकारात्मकता (Negativity) तुमच्या कार्यावर वाईट नजर (Evil Eye) आणू शकते. त्यामुळे काही गोष्टी शेअर करण्याआधी दोनदा विचार करणं गरजेचं आहे.
अनेक वेळा असं दिसून आलं आहे की, आपण एखाद्या योजनेबद्दल किंवा आपल्या यशाबद्दल बोलल्यानंतर ते पूर्ण होण्याआधीच थांबतं. यामागे मोठं कारण म्हणजे इतरांकडून लागलेली नकारात्मक ऊर्जा. त्यामुळे काही गोष्टी खाजगी ठेवणं हेच शहाणपणाचं आहे.
पहिली चूक — स्वतःचं यश आणि वैयक्तिक नातेसंबंध सांगणे :
तुमचं यश (Success) सर्वांना सांगण्याची सवय बदलणं आवश्यक आहे. मोठ्या यशाची घोषणा आधी केल्याने इतरांची ईर्ष्या आणि नकारात्मक भावना तुमच्या मार्गात अडथळा आणू शकतात. मेहनत करा आणि यश मिळाल्यानंतर जगाला ते स्वतः दिसू द्या.
त्याचप्रमाणे तुमची लव्ह लाईफ आणि नातेसंबंध (Love Life & Relationship) शक्य तितकी खाजगी ठेवा. आजकाल सोशल मीडियावर रिलेशनशिप दाखवण्याची ट्रेंड वाढली असली, तरी काही दिवसांत नातं तुटताना दिसतं. जोपर्यंत नातं स्थिर आणि कायमचं होत नाही, तोपर्यंत ते जगासमोर आणणं टाळा.
Life Tips | तुमच्या योजना, उत्पन्न आणि आनंद ‘गुप्त’ ठेवा :
तुमचे भविष्याचे प्लॅन (Future Plans) आणि रणनीती (Strategy) इतरांशी शेअर करू नका. तुमच्या विचारांची चर्चा जास्त झाली की, लोकांच्या मते आणि त्यांच्या नकारात्मक (Negativity) प्रतिक्रिया तुमचं मन विचलित करू शकतात. तुमच्या स्वप्नांवर शांतपणे काम करा आणि परिणाम स्वतः बोलू द्या.
तुमचा पगार, उत्पन्नाचे स्रोत (Income Sources) किंवा आर्थिक माहिती सर्वांसोबत शेअर करणं टाळा. आर्थिक यश हे नेहमीच लोकांच्या लक्षात राहतं आणि यामुळे नको ती ईर्ष्या निर्माण होते. त्याचप्रमाणे तुमचा वैयक्तिक आनंद (Personal Happiness) प्रत्येकासोबत शेअर करण्याची गरज नाही — काही गोष्टी मनात ठेवल्या की शांतता मिळते.
प्रवासाचे नियोजन आणि खास क्षण गुप्त ठेवा :
आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकजण आपले प्रवासाचे फोटो आणि योजना आधीच जाहीर करतो. मात्र, असं केल्याने लोकांची मते, ईर्ष्या आणि नकारात्मकता अनाहूतपणे तुमच्याकडे आकर्षित होते. त्यामुळे प्रवास संपल्यानंतर अनुभव शेअर करा, आधी नाही.
जीवनातील काही गोष्टी स्वतःपुरत्या ठेवणं ही कमजोरी नसून शहाणपणाची खूण आहे. खूप वेळा आपण आपल्या नशिबाचे दरवाजे स्वतःच्या तोंडाने बंद करतो. म्हणूनच, यशस्वी होण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी ‘काय शेअर करावं आणि काय नाही’ याचं भान ठेवणं गरजेचं आहे.






