Aishwarya Rai | बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन आज अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यासोबत सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. मात्र, लग्नाआधी ऐश्वर्याचं नाव अनेक श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींशी romantic रिलेशनमध्ये जोडलं गेलं. फक्त सलमान आणि विवेक ओबेरॉयच नाही, तर काही अप्रत्यक्ष प्रेमसंबंधांची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत राहिली.
हेमंत त्रिवेदी – डिझायनरपासून प्रेमाच्या चर्चेपर्यंत :
मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी ऐश्वर्याने जो गाऊन परिधान केला होता, तो डिझाईन करणारे हेमंत त्रिवेदी यांचं नाव तिच्यासोबत romantic रिलेशनमध्ये जोडण्यात आलं. दोघांच्या जवळीकीबद्दल बऱ्याच चर्चा होत्या, जरी यावर कधीही अधिकृत वक्तव्य आलं नाही.
साबीर भाटिया, ज्यांनी आपली ‘Hotmail’ कंपनी बिल गेट्सना विकली, त्यांच्या आणि ऐश्वर्याच्या नात्याची चर्चा काही काळ जोरात होती. काही रिपोर्ट्सनुसार साबीर यांनी ऐश्वर्याशी लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.
Aishwarya Rai | मार्टिन हेंडरसन – विदेशी हिरो आणि ‘ब्राइड अँड प्रिज्युडिस’ :
2004 मध्ये आलेल्या ‘ब्राइड अँड प्रिज्युडिस’ सिनेमात ऐश्वर्या राय आणि मार्टिन हेंडरसन एकत्र दिसले. त्यावेळी दोघांच्या जवळिकीबाबत अनेक आंतरराष्ट्रीय गॉसिप्स रंगल्या. जरी त्यांचं नातं सार्वजनिकरीत्या कबूल झालं नाही, तरी चर्चांना उधाण आलं होतं.
‘धूम 2’ मध्ये ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन यांच्यातील किसिंग सीनमुळे दोघांचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चांना तुफान वेग आला. दोघे एकत्र दिसत असल्याने त्यांच्या रिलेशनशिपवर अनेक तर्क-वितर्क लावले गेले. (Aishwarya Rai)
ऐश्वर्याच्या मॉडेलिंगच्या दिवसांत राजीव मुलचंदानी यांच्यासोबतचं नातं गॉसिप कॉलममध्ये नेहमीच चर्चेचा विषय होतं. दोघांची मैत्री पुढे प्रेमात बदलल्याची चर्चा होती. मात्र हे नातं फार काळ टिकले नाही.






