Pune Traffic Today l आज वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने नागरिक हा दिवस जल्लोषात साजरा करतात. तसेच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी करतात. त्यामुळे पुण्यातील लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. मात्र आज सायंकाळी 5 वाजल्यानंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
लष्कर भागातील वाहतुकीमध्ये मोठे बदल :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे आज वळविण्यात येणार आहे. तसेच इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, याशिवाय अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे आज सायंकाळी वळविण्यात येणार आहे. याशिवाय इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. यासोबतच सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
Pune Traffic Today l फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल होणार :
फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतुकीमध्ये देखील बदल होणार आहेत. यावेळी कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार आहे. तसेच या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात येणार आहे.
याशिवाय जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, ओंकारेश्वर मंदिर, पुणे महापालिका भवन, उपरस्ते, छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे.
News Title : 31 december traffic diversion today in pune
महत्वाच्या बातम्या –
पुणेकरांनो गडकिल्ले, टेकड्यांवर 31st साजरा करताय?; मग ही बातमी वाचाच
वर्षअखेरीस गुड न्यूज, सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
वाल्मिक कराड कुठे लपून बसलाय?, सर्वात मोठी अपडेट समोर
मुंबईकरांनो थर्टी फर्स्टला दारू आणि पार्ट्या जरा जपून; अन्यथा…
‘नक्की कोण कुणाचा आका?’; वाल्मिक कराडचा शिंदे-फडणवीस व अजितदादांसोबतचा फोटो व्हायरल






