Eknath Shinde | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. जळगाव आणि हिंगोली जिल्ह्यांतील दोन प्रभावी माजी आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे अनुक्रमे भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेची ताकद मात्र वाढली आहे.
अमळनेरमध्ये भाजपला खिंडार
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली असून, अमळनेर (Amalner) विधानसभा मतदारसंघाचे माजी अपक्ष आमदार शिरीष चौधरी (Shirish Chaudhari) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या काही निवडणुकांपासून त्यांचा भाजपला (BJP) पाठिंबा होता, त्यामुळे त्यांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
चौधरी यांच्यासोबतच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक गुलाब पाटील (Gulab Patil), माजी शहरप्रमुख प्रवीण पाठक (Pravin Pathak), माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल महाजन (Anil Mahajan), माजी सभापती श्रीराम चौधरी (Shriram Chaudhari), देविदास महाजन (Devidas Mahajan) यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हाती भगवा घेतला आहे, ज्यामुळे अमळनेरमध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
हिंगोलीत काँग्रेसला धक्का
दुसरीकडे, हिंगोली (Hingoli) विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे (Congress) माजी आमदार हरीभाऊ पाटील गोरेगावकर (Haribhau Patil Goregaonkar) यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मराठवाड्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर (Sunil Patil Goregaonkar) आणि इतर अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले (Bharatsheth Gogawale), जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






