Kunbi Certificate Documents | मराठा समाजाच्या दीर्घ आंदोलनानंतर सरकारने जीआर काढून कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. बीड, धाराशिव, हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांत प्रमाणपत्रे दिली जात आहेत. मात्र, हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जमा करावी लागत आहेत. (Kunbi Certificate Documents)
तब्बल 16 कागदपत्रांची गरज :
कुणबी प्रमाणपत्रासाठी एक-दोन नव्हे तर १६ कागदपत्रे सादर करावी लागतात. यात वंशावळ तपासणी, शालेय दाखले, गावपातळीवरील अहवाल अशा विविध पुराव्यांचा समावेश आहे. त्यापैकी काही महत्त्वाची कागदपत्रे अशी –
वडिलांची शालेय शिक्षणाची टीसी
शाळा सोडल्याचा दाखला
आजोबांची टीसी
वंशावळ (वंशावळ १, वंशावळ जुळवणी समिती अहवाल)
खासरा १, २, ३
गावपातळीवरील स्थानिक समिती अहवाल
अॅफिडेव्हिट व इतर पुरावे
यामध्ये विशेषतः ८, ९, १० क्रमांकाची कागदपत्रे (खासरा रेकॉर्ड्स) मिळवणं फारच कठीण मानलं जातंय. अनेक गावांमध्ये अजूनही ही नोंदी व्यवस्थित उपलब्ध नसल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Kunbi Certificate Documents | वंशावळ तपासणीची प्रक्रिया :
गावपातळीवर स्थानिक समित्या वंशावळ अहवाल तयार करत आहेत. यामध्ये व्यक्तीच्या कुटुंबाचा इतिहास, जमिनींच्या नोंदी आणि पूर्वजांची शालेय कागदपत्रे तपासली जातात. या संपूर्ण प्रक्रियेनंतरच प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेळ लागत आहे. (Kunbi Caste Proof)
सरकारच्या निर्णयानंतर जरी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला झाला असला तरी ओबीसी नेत्यांचा विरोध कायम आहे. छगन भुजबळ (Chhgan bhujbal) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास मूळ ओबीसींवर अन्याय होईल. आम्ही याविरोधात कोर्टात जाणार आहोत.” त्यामुळे आरक्षणाचा हा लढा अजून न्यायालयीन पातळीवर रंगण्याची शक्यता आहे.






