आज १३ ऑक्टोबर २०२५; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

On: October 13, 2025 12:01 PM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope | मेष – आजचा दिवस शुभ फलदायी असणार आहे. विचार अचानक बदलतील त्यामुळे निर्णय घेणे अवघड जाणार असल्याने आज कोणताही निर्णय घेणे टाळावे. आज कामानिमित्त किंवा इतर कारणामुळे प्रवास होऊ शकतो. लेखन कार्यास आज परिस्थिती अनुकूल. बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमय होणार असून स्त्रीशी वाद घालू नये.

वृषभ – आज चंचल मनस्थिती राहील आणि त्यामुळे तुमच्या हातातली संधी जाऊ शकते. सावधगिरी बाळगणे आवश्यक. समजुदारीने वागून वादविवाद टाळले जाऊ शकतात. आज प्रवासात अडचण निर्माण होऊ शकते. कलाकार, लेखक किंवा सल्लागार यांच्यासाठी आज दिवस अनुकूल आहे.

मिथुन – आजचा दिवस स्फ्रूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, वस्त्रालंकार आणि मिंत्रांचा सहवास लाभेल. आजच दिवस आनंददायी जाणार आहे. दाम्पत्य जीवनात सुख समाधान लाभेल. आर्थिक लाभ आणि नियोजन यासाठी आज वातावरण उत्तम.

कर्क – आज शरीर आणि मन अस्वस्थ राहू शकते. शंका आणि द्विधा मनस्थितीमुळे आज निर्णय घेणे अवघड जाईल. कुटुंबियांसोबत वाद होऊन मन अस्वस्थ होईल. आईच्या स्वास्थ्याची काळजी वाटेल. पैसे खर्च होणार आहे. आज वादविवादापासून दूर राहणे सोईचे राहील.

सिंह – आजचा दिवस लाभदायक राहणार आहे. परंतु आज द्विधा मनस्थितीमुळे हातातली संधी जाऊ शकते. त्यामुळे सतर्कता बाळगणे सोयीचे राहील. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक राहील. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद मिळतील. घरत मंगल कार्यालय ठरण्याची शक्यता. व्यापारात वृद्धी होईल. मित्रांचा सहवास लाभदायक ठरेल.

कन्या – आजचा दिवस उत्तम आहे. ठरवलेले काम आज पूर्ण होतील. आज वडिलांविषयी आत्मीयता वाढेल आणि त्यांच्यामुळे लाभ होईल. व्यापारी आणि नोकरदार आपल्या क्षेत्रात पुढे जातील. मानसम्मान वाढेल. धनलाभ होईल. सरकारकडून लाभ होईल. प्रकृती देखील उत्तम राहणार असून आज कुटुंबासोबतही आनंददायी दिवस जाईल.

तूळ – आजचा दिवस साधारण आहे. आज तुम्हाला दूरचा प्रवास करावा लागू शकतो. परदेशी प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल. संतती आणि स्वास्थ्याची काळजी वाटेल. नोकरदारांना कामात सहकाऱ्यांकडून अपेक्षित मदत मिळणार नाही. विरोधकांशी कोणतीही चर्चा करणे टाळावे

वृश्चिक – वाणी आणि कृती यावर आज विशेष संयम ठेवावा लागेल. आज आजारी पडण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. दैनंदिन कामाव्यतिरिक्त कुठलेच नवीन काम करू नका. आज अचानक धनलाभ होईल. अभ्यासासाठी आज वातावरण अनुकूल. चिंतन मनन यात वेळ जाईल.

धनु – आज बौद्धिक, तार्किक विनिमय, लेखन यासाठी उत्तम दिवस नाही. मनोरंजन, प्रवास, मित्रांचा सहवास यामुळे दिवस छान जाईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीशी जवळीक वाढेल. भागीदारीत फायदा होईल. एकंदरीतच आजचा दिवस छान आहे.

मकर – आज तुमची ऊर्जा बचतीच्या सवयीमुळे तुम्हाला कामी येईल. आज कामाचा भर जास्त राहील, पण तुमचे स्वास्थ्य चांगले असल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत करा, त्यांना वेळ द्या. मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जा. आजचा दिवस उल्लेखनीय राहणार आहे.

मीन – आजच्या दिवसाचे नियोजन काळजीपूर्वक करा. तुमची विनोदबुद्धी तुम्हाला कमी येईल. आज स्वास्थ्याची काळजी घ्या. कुटुंबासोबत वाद होऊ शकतो. आईचे स्वास्थ्य बिघडेल. अनावश्यक घटनांमुळे मन निरुत्साहित होईल.

कुंभ – आज आरोग्यासाठी दिवस वित्तम आहे. उत्साहात दिवस जाईल आणि आत्मविश्वास येईल. बहीण भावामुळे आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे वागणे आज विचित्र होऊ शकते तरी तुमाला जोडीदाराची साथ लाभेल. उलटे उत्तर देणे टाळावे.

Title – 13 october 2025 Today Horoscope

Join WhatsApp Group

Join Now