बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार हॉलतिकीट, अशाप्रकारे करा डाऊनलोड

On: January 10, 2025 12:06 PM
HSC Admit Card
---Advertisement---

HSC Admit Card l अवघ्या काही दिवसांवर बारावीच्या बोर्डाची परीक्षा आली आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. अशातच आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी – मार्चमध्ये होणार आहेत. अशातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेच हॉलतिकीट आजपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ऑनलाईन प्रवेशपत्र मिळणार :

विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉलतिकीट हे ऑनलाईन स्वरूपात देखील मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हॉलतिकीट डाऊनलोड करावं लागणार आहे. मात्र त्यानंतर ऑनलाईन प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून सही व शिका घ्यावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांना हॉलतिकीट डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

HSC Admit Card l हॉलतिकिटवर सही शिक्का घेणे बंधनकारक :

याशिवाय विद्यार्थी संबंधित महाविद्यालयातून ऑफलाईन स्वरूपात देखील हॉलतिकीट घेऊ शकतात. मात्र त्या हॉलतिकिटावर प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांचा सही शिक्का घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच महाविद्यालयातून हॉलतिकीट घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.

याशिवाय हॉलतिकिटावर काही दुरुस्त्या असल्यास उदा. नाव, आईचे नाव, जन्मतारीख अशी काही दुरूस्त्या असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने दुरुस्त करण्यात याव्यात. मात्र त्यासाठी शाळा, महाविद्यालयांनी संबंधित लिंकद्वारे दुरूस्ती शुल्क भरून दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठवावे.

News Title : 12th students will get admit card

महत्वाच्या बातम्या –

नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? तर ही बातमी वाचाच

‘…तर कायमची वाट लावेन, हात-पाय तोडेन’; चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडची धमकी?

सरपंच हत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती, वाल्मिक कराडचा पाय खोलात?

लग्नसराईत दागिने घ्यायचा विचार करताय?, पाहा लेटेस्ट 1 ते 10 ग्रॅम सोन्याचे दर

भयंकर! वर्षभराच्या बाळासह कुटुंबातील 5 जणांची हत्या, नंतर मृतदेह गोणीत भरून…

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now