Cough Syrup Deaths | लहान मुलांना खोकला, ताप, आला की हमखास दिले जाणारे औषध म्हणजे कफ सिरप. पण याच कफ सिरपमुळे तब्बल ११ लहान मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये हा प्रकार समोर आला असून या घटनेने संपूर्ण देशात आता कफ सिरप संदर्भात भीती निर्माण झाली आहे. (Cough Syrup Deaths)
नेमकं काय घडलं? :
बनावट कफ सिरपमुळे आमच्या मुलांचा मृत्यू झाला आहे, असा गंभीर आरोप मृत मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात एकूण ९ मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर राजस्थानमधील भरतपूर (Bharatpur) आणि सीकर (sikar) येथे प्रत्येक एका मुलाने या कफ सिरपचे सेवन केल्याने दगावले आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये एकूण अकरा लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. (Cough Syrup Deaths)
ही घटना घडल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीतून कफ सिरप तयार करणाऱ्या कंपन्यांनी बनावट कफ सिरप तयार केल्याचे समोर आहे. हे कफ सिरप तयार करताना एक तर गुणवत्तेची चाचणी केलेली नाही. तसेच कच्चा माल कोणता होता, याचीही कोणती नोंद ठेवण्यात आलेली नाही, हे समोर आलेले आहे. विशेष म्हणजे कफ सिरपच्या लेबलिंगमध्येही गडबड असल्याचे समोर आले आहे.
सिरपमध्ये वाहनांसाठी वापरले जाणारे रसायन :
वाहनांच्या निर्मितीत वापरले जाणारे रसायन या कफ सिरपमध्ये वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रातर्फे कफ सिरप जमा करण्यात आले आहेत. राजस्थान सरकारने मुख्यमंत्री मोफत औषध वाटप योजनेअंतर्गत कफ सिरपचे वाटप सुरु केले होते. लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर हे वाटप थांबवण्यात आले आहे. तर मध्यप्रदेशमधील छिंदवाडा येथे दोन ब्रँडच्या कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे.
ज्या कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे, त्या एकूण 23 कफ सिरपच्या सॅम्पलचा अभ्यास करण्यात आला. यातील तीन कफ सिरपमध्ये डायइथीलन गायकॉल (डीईजी) तसेच एथिलीन ग्लायकॉल (आजी) हे घटक असल्याचे समोर आले आहे. हे घटक वाहनांमध्ये कुलंट तसेच ब्रेक फ्ल्यूड म्हणून वापरले जाते.
दरम्यान, आता कफ सिरमध्ये वाहनांच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन वापरले जात असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.






