नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

On: October 18, 2024 12:16 PM
Maratha Scholarship Stop
---Advertisement---

School l नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण आता नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल होणार आहे. आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सात, आठ नाही तर तब्बल 15 विषयांचा अभ्यास करावा लागणाार आहे. त्यामुळे आता शाळांची वेळ देखील वाढण्याची शक्यता आहे.

तब्बल ‘इतक्या’ विषयांचा समावेश :

अभ्यासक्रमानुसार आतापर्यंत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सात किंवा आठ विषय शिकवले जात होते. मात्र आता नव्या अभ्यासक्रमानुसार व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण आणि आंतरविद्याशाखा हे विषय देखील बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय तीन भाषा, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान, गणित, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेले तीन असे एकूण मिळून दहा विषय असणार आहे. याशिवाय नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड हे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.

School l कधीपासून लागू होणार? :

शालेय विभागाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा मोठा बदल केला आहे. हा बदल करताना भारतीय भाषांची मात्र सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मुख्य विषयांचा ज्ञान या विद्यार्थ्यांना व्हावे याबाबत देखील विचार केला गेला आहे. आता यासंदर्भात शाळांकडून सूचना आल्यानंतर या नवीन विषयांचा अभ्यास करुन हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

तसेच व्यावसायीक शिक्षणामध्ये इयत्ता नववीसाठी विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरूस्ती, सौंदर्य या व्यवसायांची ओळख करून देण्यात येणार आहे. तर दहावीला सुतारकाम, बागकाम, परिचर्या या व्यवसायांची ओळख करून देण्यात येणार आहे.

News Title – 10th and 9th standard number of subjects will increase

महत्त्वाच्या बातम्या-

बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रुफ कार; किंमत ऐकून व्हाल थक्क

मोठी बातमी! आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?, मतदारसंघही ठरला?

सणासुदीत ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या भाव

उद्धव ठाकरेंचा महायुतीला दुहेरी धक्का; दोन बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर?

आज शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींना होणार धनलाभ!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now