तनिषा भिसेंच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर रूपाली चाकणकरांचा धक्कादायक खुलासा!

On: April 7, 2025 5:06 PM
Rupali Chakankar
---Advertisement---

Rupali Chakankar | पुण्यातील (Pune) प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गर्भवती महिला तनिषा भिसे यांना वेळेवर उपचार न दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणाबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत.

ऑपरेशनपूर्वी १० लाखांची मागणी

रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट सांगितलं की, तनिषा भिसे यांच्यावर डॉ. घैसास (Dr. Ghaisas) यांच्याकडे पूर्वीपासून उपचार सुरु होते. २८ मार्च रोजी ती अत्यवस्थ स्थितीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाली. सकाळी ९ वाजता तिची रुग्णालयात एन्ट्री झाली. डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर डिलिव्हरीसाठी ऑपरेशनची तयारी सुरू झाली, पण त्याच वेळी रुग्णालयाकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. कुटुंबियांनी त्या क्षणी तीन लाख रुपये दिले आणि उर्वरित रक्कम लवकरच भरण्याची तयारी दर्शवली, तरीही रुग्णालयाने तत्काळ उपचार सुरू केले नाहीत.

रुपाली चाकणकर यांच्या मते, मंत्रालयातून विविध विभागांमार्फत रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न झाले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने कोणत्याही फोनकडे लक्ष दिलं नाही. परिणामी, तनिषा यांना तात्काळ योग्य उपचार मिळाले नाहीत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पेशंटच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर

ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाने एका अंतर्गत समितीची स्थापना केली आणि स्वतःवरचे आरोप टाळण्यासाठी तनिषा भिसे यांची वैयक्तिक वैद्यकीय माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली. या गोष्टीचा तीव्र निषेध करत रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ही अत्यंत असंवेदनशील आणि नियमबाह्य कृती आहे. या गोष्टीवर कुटुंबियांनी देखील तीव्र आक्षेप घेतला आहे.

त्याचबरोबर, पेशंट साडेपाच तास रुग्णालयात असतानाही उपचार झाले नसल्याचं त्यांनी सांगितलं. रक्तस्त्राव रोखण्यासाठी डॉक्टर्सने नातेवाईकांना सांगितलं की, “तुमच्याकडे टॅबलेट असतील तर घ्या.” हा सगळा प्रसंग तनिषा यांच्या समोर घडत होता. अखेर गंभीर स्थितीत असलेल्या तनिषा यांना सूर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, जिथे लगेच उपचार सुरू करण्यात आले.

 Title: 10 Lakh Demanded Before Treatment: Rupali Chakankar

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now