"टॉयलेटमधून बाहेर येताच त्याने मागून...'; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 

www.thodkyaat.com

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री मीनू मुनीर हिनं एका प्रसिद्ध सीनियर अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.  

माझ्याबरोबर शारीरिक शोषण आणि शाब्दिक गैरवर्तन झालं आहे, असं तिने सांगितलं. 

तिनं पुढे लिहिलंय, "मला मल्याळम इंडस्ट्री सोडून चेन्नईला शिफ्ट होण्यासाठी भाग पाडण्यात आलं."

ती म्हणाली, "सिनेमाच्या शुटींगवेळी मी टॉयलेटला गेले होते. मी बाहेर आले तेव्हा मला मागून पकडलं. माझ्या मनाविरुद्ध मला किस केलं" 

"मी शॉक झाले आणि तिथून पळून गेले. मी त्याच्याबरोबर राहिले तर तो मला काम देईल अशी ऑफर त्याने दिली"

अभिनेत्री पुढे म्हणाली, "मल्याळम इंडस्ट्रीमध्ये खूप शोषण केलं जातं. मी त्याची साक्षीदार आहे."